आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्ट आणि संघर्षातूनच जातो यशाचा मार्ग, आयएएस अधिकारी बालाजी मंजुळे यांचे मत, ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर संमेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- संघर्षातून यशाचा मार्ग दिसतो आणि खडतर कष्टातूनच यश मिळते, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी बालाजी मंजुळे यांनी व्यक्त केले. ड्रीम फाउंडेशन आयोजित ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर संमेलनात बोलत होते.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित दोन दिवसीय संमेलनाचा समारोप रविवारी झाला. या वेळी आयएएस अधिकारी मंजुळे यांची प्रकट मुलाखत गुरुशांत धुत्तरगावकर यांनी घेतली. मंजुळे यांनी शिक्षण घेताना आलेल्या अडचणी आणि त्यातून यश मिळवण्यासाठी घेण्यात आलेले परिश्रम याबाबत माहिती दिली. संमेलनाचे उद््घाटन सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रातही डीवायएसपी डॉ. प्रशांत अमृतकर, समाजकल्याण आयुक्त नागेश चौगुले यांचे मार्गदर्शन झाले. आनंद मसलखांब यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश लामकाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर संमेलनात बोलताना बालाजी मंजुळे. समोर उपस्थित विद्यार्थी.
डॉ. शेटे प्रा. लोंढे यांचे मार्गदर्शन
शेवटच्या सत्रात शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे प्रा. शशिकांत लोंढे यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, संगीता भतगुणकी, महादेव जंबगी, सुभेदार पेठकर, शंकर चौगुले, प्रभाकर गायकवाड, किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.