आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याच्या वाट्याला आला कोरडा पावसाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मोसमी पावसाचा निम्मा काळ संपला. या काळात जिल्ह्याच्या वाट्याला कोरडा पावसाळा आला आहे. 1 जून ते 4 ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालावधीत सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे.

खरिपाची पेरणीही समाधानकारक नसल्याने आता सर्व भिस्त रब्बी हंगामावरच राहिली आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यात फक्त 122.14 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 255.22 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

मागील दोन महिन्यात खरिपासाठी पुरेसा व समाधानकारक पाऊस नसल्याने तूर, सोयीबीन, मका आदी खरीप पिके धोक्यात आहेत. शिवाय अनेक जलसाठे कोरडेच आहेत. उजनी धरणाचा साठा किमान पातळीच्या वर आलेला असला तरी तो भरल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचे पुढील वर्षीचे नियोजन करता येणार नाही. जिल्ह्यातील सर्वाधिक नगदी पीक असलेल्या उसाची मोठी चिंता असणार आहे. गेल्या दोन महिन्यात एकही मोठा पाऊस झाला नसल्याने सध्या खरीप पिके संकटातच आहेत.

उर्वरित दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पिकांबरोबर रब्बी हंगामाला लाभदायक ठरेल. शिवाय जिल्हावासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मागील दोन महिन्यात फक्त सांगोला आणि करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस आहे. माळशिरस व पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस असल्याची नोंद झाली आहे.