आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळ - पाण्याअभावी कावळेवाडीत लग्नसमारंभच होईनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर - बहुतांश गावात एकतर पाणीटंचाई किंवा दूषित पाणीपुरवठा यापैकी एका समस्येने ग्रामस्थ बेजार असतात. परंतु, उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी हे गाव पाणीटंचाई बरोबरच दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोने बेजार झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावाला टँकरच्या पाण्यावरच आपली गरज भागवावी लागत आहे. एवढेच नव्हे तर या कालावधीत एकही विवाहसोहळा गावात पार पडला नाही. अशा द्विधा अवस्थेत प्रचंड गैरसोय सहन करत आयुष्य कंठणा-या कावळेवाडीकरांकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींना वेळ आहे.
कावळेवाडी हे 2 हजार लोकसंख्येचे गाव. या गावाला पूर्वी गावातच असलेल्या दोन जुन्या आडातून पाणीपुरवठा होत होता. नंतर विकासकामांच्या नावाखाली दोन कूपनलिका घेण्यात आल्या. अन् जुने स्रोत असलेल्या दोन्ही आडाकडे दुर्लक्ष झाले. कालांतराने दोन्ही कुपनलिकांचेही पाणी आटले. आणि गावाला पाणीपुरवठ्यासाठी 18 लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, ही योजनाही निरुपयोगी ठरल्याने ग्रामस्थांचा वनवास सुरू झाला. अगोदरच पाण्याअभावी हाल सोसणाºया ग्रामस्थांचा खासगी कूपनलिकेतून मिळणाºया पाण्याचाही आधार तेरणा कारखान्यातील मळीच्या प्रदुषणामुळे हिरावून गेला. गाव व परिसरात कोठेही कूपनलिका घेतली तरी मळीमिश्रित पाणी मिळते. यामुळे प्रशासनाने तीन वर्षापूर्वी तीन टँकरद्वारे दररोज 36 हजार लिटर पाणीपुरवठा सुरू केला. यातूनच चार ते पाच घागरीसाठी प्रत्येक घरातील एक व्यक्ती दिवसभर टँकरच्याच प्रतीक्षेत असते. कावळेवाडी गाव तेरणा साखर कारखान्याच्या पायथ्याशी आहे. मळीयुक्त पाण्यामुळे 50 टक्के ग्रामस्थांना मुतखडा अथवा पोटाच्या विकाराने ग्रासले आहे. गॅस्ट्रोचा आजार तर नित्याची बाब बनली आहे. 2004 मध्ये दूषित पाण्यामुळे सावित्री मुरलीधर कोळी व मोहन मुरलीधर कोळी या मायलेकरांचा मृत्यू झाला. दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तीन वर्षांपासून लग्नकार्य नाही
पाणीटंचाई व दूषित पाण्यामुळे गावातील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. शेतीलाही अशाच पाण्याचा वापर होत असल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने नागरिकांचा वैद्यकीय सेवेसाठी तेर, ढोकी येथे सतत राबता असतो. एवढेच नव्हे तर गावातील पाणीटंचाईच्या कारणामुळे गेल्या तीन वर्षांत एकही लग्नकार्य गावात पार पडले नाही. लग्नासाठी ग्रामस्थांना तेर अथवा ढोकी येथे आधार घ्यावा लागतो. या पाणीटंचाईला वैतागून गावातील 15 तरुण गाव सोडून बाहेरगावी वास्तव्यास गेले आहेत.
पेयजल योजनेतही समावेश नाही
गावाचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी 18 लाख रुपये खर्चून 3 हजार 700 फुट जलवाहिनी अंथरून तसेच पाण्याच्या साठ्यासाठी 40 हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधून योजना राबविण्यात आली. परंतु, ही योजनाही सपशेल अपयशी ठरली. एकीकडे पाणीपुरवठा योजनेवर 18 लाख रुपये खर्च केल्यामुळे गावाचा रा ष्ट्रीय पेयजल योजनेतही सहभाग होत नाही. त्यामुळे सध्यातरी ग्रामस्थांच्या पाण्याची मदार दररोज येणाºया तीन टँकरवरच आहे. यासाठीही दिवसभर ताटकळत बसावे लागते. तेव्हा अवघे पाच ते सहा घागरी पाणी मिळते.
- दिवसभर काम बुडवून पाण्याची वाट पहावी लागते. यातूनही 5 ते 6 घागरी पाणी मिळते. त्यात भागत नाही. शेतातही मळीयुक्त पाणी असल्याने घरातूनच पिण्यासाठी पाणी घेऊन जावे लागते. चहा, दूधही दूषित पाण्यामुळे नासत आहे. या जन्मात तरी चांगले, स्वच्छ पाणी मिळेल का?’’ विजया आगतराव शिंदे
४15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची ही समस्या कायम आहे. दूषित पाण्यामुळे गाव बेकार झाला आहे. सतत गॅस्ट्रोची लागण झाली की लोक ढोकीला पळतात. तेरणा प्रक ल्पातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.’’अच्युत जराड.

- जलस्वराज्यची योजना पाण्याअभावी फोल ठरली आहे. यामुळे पेयजल योजनेत गावाचा समावेश होत नाही. कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना जीवन प्राधिकरणमार्फ त राबविल्यास गावाला पाणी मिळेल. जिल्हाधिकाºयांनी आमच्या व्यथा जाणून घेऊन यातून मार्ग काढावा.’’
अनुसया कोळी, सरपंच.