आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी. एड. प्रवेश फसवणूक; तीन वर्षे सक्तमजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मेरी बी हार्डिंगमध्ये डी. एड.ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकास न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली आहे.

विलास शंकर कुरणे (वय 50, रा. ठाणे) यांची मुलगी श्वेता हिस बीएड महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मेरी बी हार्डिंग येथे ऑक्टोबर 1999 मध्ये अर्ज केला होता. त्यावेळी आरोपी पुरुषोत्तम आखाडे (वय 80, रा. सोलापूर) यांनी महाविद्यालयाचा अध्यक्ष मी असून आपले प्रवेशाचे काम होईल, असे सांगत 40 हजार रुपये घेतले. श्वेता हिस हॉस्टेलमध्ये प्रवेशही मिळवून दिला. परंतु पुढे महाविद्यालयात प्रवेश मिळालाच नाही. याप्रकरणी विलास कुरणे यांनी गुन्हा नोंदविला. सरकारतर्फे विकास देशपांडे तर आरोपीतर्फे एन. एच. माने यांनी काम पाहिले.