आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल इंडिया संकल्पनेमुळे देशात भ्रष्टाचार कमी होईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डिजिटल इंडिया म्हणजे प्रत्येकाच्या हातात मोबाइल आणि लॅपटॉप असा अर्थ नाही. ही सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा त्यामागचा खरा उद्देश आहे. त्याने शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार कमी होईल, असे मत माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अतुल कहाते यांनी येथे सांगितले.
डिजिटल इंडिया सप्ताहानिमित्त नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “डिजिटल इंडिया ही संकल्पना केवळ शहरी अथवा निमशहरी भागांपुरता मर्यादित नाही. ती खेडोपाडी पोहोचवणे महत्त्वाचे आहे. ही योजना निरक्षर अथवा असक्षम लोकांपर्यंत पोचवताना अनेक उद्योगांच्या संधी कशा निर्माण होतील, याकडे व्यापक दृष्टीने बघणेही महत्त्वाचे आहे.
बऱ्याच वेळा अशिक्षितांना आर्थिक व्यवहारासाठी अंगठ्याचा वापर करावा लागतो. तिथे ‘एटीएम’ची सुविधा त्यांना देता येते. ही बाब जाणून एका संशोधकाने अंगठ्याचा वापर करून ‘एटीएम’मधून पैसे कसे काढता येतील, याचा शोध लावला. त्याला बायोमॅट्रिक्स ‘अथोराइज्ड एटीएम मशीन’ म्हटले अाहे. ते अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. तिथे अशिक्षित व्यक्ती सहजगत्या पैसे काढू शकतात.”संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी स्वागत केले. हेमलता जोशी कनक कवडी यांनी सूत्रसंचालन केले. शामली साळुंखे यांनी आभार मानले. या वेळी सर्व विभागप्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.
संधी ओळखा
- डिजिटल इंडियामुळे अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. संधी निर्माण करण्याचे मार्गही सापडतील. त्यासाठी व्यापक दृष्टिकोन महत्त्वाचा वाटतो. विद्यार्थ्यांनी सातत्याने व्यवसायाच्या संधी शोधाव्यात. उद्योजकतेकडे कल वाढवावा. तरच एका आधुनिक विश्वात त्यांचे स्थान बळकट होईल. शिक्षणानंतर जो नोकरी शोधतो, तो अतिशय मर्यादित राहतो. आव्हाने स्वीकारून जो पुढे जातो, तोच यशस्वी होते.”
अतुल कहाते, माहितीतंत्रज्ञान तज्ज्ञ