आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचे आवाहन: मनपा शाळेतील ई-लर्निंगसाठी शिक्षण मंडळाने केला निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- खासगी विविध संस्थांच्या शाळांच्या स्पर्धेत उतरता येत नसले तरी महापालिका शाळांमध्ये शिकण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी शाळांच्या शिक्षकांनी तर कंबर कसलीच आहे. दोन शाळांमध्ये लर्निग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता तिसऱ्या शाळेतही ही सोय केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण मंडळाने मनपाच्या इतर शाळांमध्येही अशी सुविधा देण्याचा निर्धार केला आहे. त्याकरिता आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दानशूर व्यक्तीसाठी मदत घेण्यात येत आहे. या मदतीच्या माध्यमातून मनपा शाळेत खासगी शाळेप्रमाणे ई-लर्निंग सुविधा आणि इतर आधुनिक शिक्षण उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. या करिता शहरातील दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन करण्यात आले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योगपती पापाशेठ बलदवा यांनी २५ हजारांचे सहकार्य केले आहे. या रकमेतून मनपा मुलींची शाळा क्रमांक , पांढरेवस्ती शाळेत सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
ई-लर्निंगच्या इंटरॅक्टिव्ह बोर्डसाठी एकूण ७० ते ८० हजार रुपये खर्च येणार आहे. उर्वरित खर्च अमोल भोसले गंगाधर कांबळे करणार आहेत. गोरगरिबांच्या विद्यार्थांना अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनीही मदत दिली आहे.

आर्थिक मदतीसाठी दानशूरांना आवाहन
मनपामुलांची शाळा क्रमांक कुमठा नाका शाळेत कुमार करजगी यांच्या तर मनपा सुंदराबाई डागा शाळा , दमाणी नगर येथे राजेश दमाणी यांच्या आर्थिक मदतीतून इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसविण्यात आला आहे. महापालिकेच्या इतर शाळांमध्ये अशाच पध्दतीने ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शहरातील दानशूर व्यक्तींना प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या वर्गणीतून या शाळेत उपलब्ध होणार ई-लर्निंग सुविधा
- मनपा मुले , तुळजापूर वेस
- मनपा मुले २६, कॅम्प
- मनपा मुले २५ , एम्प्लॉयमेंट चौक
- सावित्रीबाई फुले कॅम्प शाळा
- मनपा डीएसके विद्यालय, विनायक नगर
- मनपा कन्नड, रामवाडी
- मनपा मुली उर्दू ३, सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय
- मनपा मुले उर्दू ५, विजापूर वेस
- उर्दू हेडक्वार्टर, ७० फूट रोड
पुढील स्लाइडवर वाचा, याबाबतच्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...