आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-लर्निंग सुविधा असलेल्या मनपा शाळांत मोफत प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आता महापालिकेच्या शाळांमध्येही ई-लर्निंगसह अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे गरिबांच्या मुलांनाही नामवंत शाळांप्रमाणे वातावरण मिळणार आहे. बालवाडी आणि पहिली ते सातवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांंना मोफत प्रवेश देणे सुरू झाले आहे. तरी पालकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही, ते महापालिका शाळेत येतात असे नेहमी घडते. शहरातील नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या रांगा लागतात. परंतु आता चित्र पालटायला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहेत. तसेच सेमी इंग्रजीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. ज्या सुविधा इंग्रजी माध्यमाच्या शाळा देतात, त्याच धर्तीवर महापालिकेमध्येही गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नेमण्यात आले आहे.

शिक्षकांचे ई-लर्निंग प्रशिक्षण पूर्ण
महापालिकेच्या शाळांमध्ये सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे पट वाढण्यास मदत होत आहे. गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना लर्निंगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महापालिका शाळांची प्रतिमा चांगली करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विष्णूकांबळे, प्रशासनाधिकारी

प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू
महापालिकांच्या शाळा गुणवत्ता चांगली आहे. मात्र प्रवेशाची संख्या वाढत नाही. त्यासाठी संघटनेचे शिक्षक मनपाच्या शाळांची प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. अत्याधुनिक तंत्राचा वापर गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अमोलभासले, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना

अशा आहेत अत्याधुनिक सेवा
- इ-लर्निंग इंटरअ‍ॅक्टिव्ह बोर्डची असेल सुविधा
- इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमाची केलीय सोय
- सुसज्ज संगणक लॅब मोफत संगणक शिक्षण
- मोफत गणवेश पाठ्यपुस्तक वाटप
- अनुभवी, तज्ज्ञ उपक्रमशील शिक्षक
- सर्व भौतिक सुविधा शाळा
- विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ
- चौथी सातवी शिष्यवृत्ती अप्रगत जादा तासिका
- विविध सहशालेय स्पर्धा शैक्षणिक उपक्रमांचे करण्यात येईल आयोजन

खासगी शाळांना मागे टाकणे सहज शक्य
नामवंतम्हणवल्या जाणार्‍या बहुतांश शाळांतील शिक्षकांना अतिशय कमी मानधनात राबवून घेतले जाते. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता स्थिर नसते. मध्येच सोडून जाण्याचे प्रमाणही अधिक असते. मनपा शाळांतील शिक्षक हे मनाने स्थिर असतात. त्यांनी मनात आणले तर खासगी शाळांना मागे टाकणे सहज शक्य आहे. स्थैर्यामुळे ढेपाळून जायचे की दर्जेदार अध्यापन करायचे याचा निर्णय मनपा शाळांतील शिक्षकांवर अवलंबून आहे.
बातम्या आणखी आहेत...