आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुंधरा महोत्सवास प्रारंभ : पर्यावरण जागर,प्लास्टिक कॅरिबॅगमुक्त सोलापूर अभियानासाठी पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर. प्लास्टिक कॅरिबॅगमुक्त सोलापूर अभियानाची सुरुवात करून गुरुवारी दुपारी कुलगुरू डॉ. मालदार यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठात चार दिवशीय किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास प्रारंभ झाला. सायंकाळी डॉ. फडकुले संकुलात छायाचित्र प्रदश्रनाचे उद्घाटन विख्यात छायाचित्रकार संदीप देसाई यांच्या हस्ते झाले.

सोलापूर- विघटन न होणार्‍या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. परिसरातील प्लास्टिक कचर्‍यामुळे स्वत:बरोबर सामाजिक आरोग्यही बिघडत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन कॅरिबॅग वापर बंद करावा, असे आवाहन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी केले. किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अंतर्गत प्लास्टिक कॅरिबॅग मुक्त सोलापूर अभियानाचा प्रारंभ गुरुवारी सोलापूर विद्यापीठात झाला.
एनटीपीसीचे पट्टाभिरामन, कुलसचिव एस. के. माळी, सुभेदार बाबूराव पेठकर, डॉ. बी. एन. कांबळे आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. मालदार म्हणाले, ‘शहराचे फुफ्फुस अशी ओळख असणार्‍या संभाजी तलावात ड्रेनेजचे पाणी व प्लास्टिक कचरा टाकण्यात आल्याने त्यामधील जलचर ऑक्सिजनअभावी तडफडून मरतात. हीच स्थिती नदीकाठची आहे. सहज उपलब्ध होणार्‍या प्लास्टिक पिशव्यांमुळे निर्माण होणार्‍या समस्या थांबवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. पर्यावरणाबाबत विद्यापीठ फारच जागरूक आहे. विद्यापीठ परिक्षेत्रात सहा लाखांपेक्षा जास्त झाडे लावल्यामुळेच शासनाचा वनश्री पुरस्कार विद्यापीठाला मिळाला, असे त्यांनी सांगितले. डॉ. रवींद्र चिंचोळकर यांनी प्रास्तविक केले. प्रा. अंबादास भास्के यांनी सूत्रसंचालन केले.
महोत्सवात नऊवारीची नवलाई
या महोत्सवात प्लास्टिक कॅरिबॅगमुक्त सोलापूरचा संकल्प करणार्‍या संयोजकांनी कल्पकतेचा एक आगळावेगळा अनुभव दिला. फाइल फोल्डरसाठी कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक न वापरता नऊवारीच्या हिरव्या, लाल खणाच्या कापडाचा वापर केला गेला. हे फाइल फोल्डर प्रदश्रनात विक्रीस ठेवण्यात आले होते.

कॅरिबॅगमुक्तचा संकल्प करा
दापोलीचे कायापालट करणारे जागतिक ख्यातीचे रामदास कोकरे यांनी आपल्या प्लास्टिक कॅरिबॅग निर्मूलनाची यशोगाथा सांगितली. सोलापूरच्या नागरिकांनी कॅरिबॅग मुक्त सोलापूरसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. हिरवळ दाटू द्या, असा संदेश देत त्यांनी विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या दापोली पॅटर्नच्या स्लाइड शोचे सादरीकरण केले.
प्रसिद्ध छायाचित्रकार संदीप देसाई यांच्या हस्ते छायाचित्र प्रदश्रनाचे उद्घाटन
संदीप देसाई म्हणाले
निसर्ग, व्यक्ती किंवा पशुपक्ष्यांचे छायाचित्रण करताना त्या-त्या घटकाचे भाव महत्त्वाचे असतात.
आपण कोणता कॅमेरा वापरतो, याची संपूर्ण माहिती असणे अतिशय आवश्यक असते.
छायाचित्रणाचा विषय जाणून त्याचे अवलोकन करणे, निरीक्षण करणे हे उत्तम छायाचित्रकाराचे लक्षण.
एखाद्या हिंस्त्र पशूचे छायाचित्र काढताना त्याच्या डोळ्यांतील भाव टिपणे यात खरी कसब असते