आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौर ऊर्जेमुळे विजेच्या वापरात झाली 70 % बचत; सोलापूर जिल्ह्यातील उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- उपवनसंरक्षक व सामाजिक वनीकरणच्या सोलापूर शहरातील मुख्य कार्यालयांसह पाच तालुक्यांत विभागीय कार्यालयांमध्ये पूर्णत: सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. कार्यालयातील संगणक, पंखे, बल्ब यांच्या वापरासाठीच नव्हे तर कूपनलिकांमधून पाणी उपसा करण्यासाठीही सौर ऊर्जा वापरली जातेय. कर्मचा-यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे कार्यालयांमध्ये विजेची मोठी बचत होत असल्याने कार्बन क्रेडिटसाठी वनविभाग प्रस्ताव सादर करणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून हे सौर ऊर्जा संच बसवण्यात आलेत. सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयातील दोन कूपनलिकांमधील पाणी उपसा करण्यासाठी एक किलो क्षमतेचे दोन सौरसंच बसवण्यात आलेत. स्मृती उद्यानात बसवलेल्या एक किलोवॅट क्षमतेच्या 15 सौर पथदिव्यांमुळे परिसर उजळला आहे. तसेच, कार्यालयातील संगणक, पंखे, दिवे सौरऊर्जेवर सुरू आहेत. वातानुकूलित यंत्रणेमुळे विजेचा जास्त वापर होऊन कार्बन उत्सर्जन होत असल्याने कार्यालयातील वातानुकूलन यंत्र कर्मचारी व अधिकाºयांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले. स्मृती उद्यानात नव्याने उभारलेल्या इको लायब्ररीत सौर ऊर्जेवरील कनेक्शन देण्यात आले. या प्रयोगामुळे सामाजिक वनीकरण विभागातील वीज बिलांत 70 टक्क्यांपेक्षा जास्त, तर उपवनसंरक्षक कार्यालयात वीज बिलात 30 ते 35 टक्के बचत झाली आहे. अधिका-यांच्या निवासस्थानातील विद्युत उपरकरणेही सौर दिव्यांवर सुरू आहेत. शैक्षणिक सहलीवर येणाºया विद्यार्थ्यांना सौर दिव्यांचा प्रकल्प आवर्जुन दाखवण्यात येतो.

मोहीम कशासाठी- कार्बन उत्सर्जन व ग्रीन हाऊस वायू उत्सर्जनाला आळा बसावा
- हवामान बदल या जागतिक समस्येची जाणीव व्हावी
- पारंपरिक ऊर्जा निर्मितीतील नैसर्गिक संसाधनांचा नाश थांबावा
- ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा, गॅस आणि तेलाचा वापर केला जातो, हे टाळण्यासाठी
- इंधनासाठी आयातीचे प्रमाण वाढले. गेल्या पाच वर्षांत कोळशाची आयात 50 दशलक्ष टनांवर पोहोचली आहे. हे थांबवण्यासाठी
- अपारंपरिक स्रोतातून ऊर्जा निर्मिती वाढण्यासाठी अर्थ अवर हे पहिले पाऊल आहे.

एकूण निर्मिती- सामाजिक वनीकरण : 26 किलोवॅट ऊर्जा
उपवनसंरक्षक कार्यालय : 7 किलोवॅट ऊर्जा
सिद्धेश्वर वनविहार : 2 किलोवॅट ऊर्जा