आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ भूकंप : आई, मी ठीक आहे, चिंता नको; दिनेशच्या फोनमुळे राठोड कुटुंबाचा जीव भांड्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आईमी सुखरूप आहे.. ठीक आहे... शिखर सर केले.. भारतात परतल्यावर सर्व काही सांगतो.. असे शब्द ऐकताच परिवार आई लक्ष्मीबाईंचा जीव भांड्यात पडतो. मंद्रूप येथील दिनेश राठोड हे पुणे शहर पोलिस दलात आहेत.
एप्रिल रोजी राठोड यांच्यासह तारकेश्वरी भालेराव सहा जणांची टीम नेपाळला गेली. माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम त्यांनी सुरू केली होती. भूकंपाच्या धक्क्यानंतर काही काळ राठोडचा संपर्क होत नसल्याने धास्तावलेले कुटुंब चिंतामुक्त झाले आहे.
२१ एप्रिल रोजी पाच हजार फूट उंचीवर पथक पोचले होते, अशी माहिती दिनेशने मंद्रूपला फोन करून कळविली. मात्र नंतर त्यांचा संपर्क झाला नाही.काल नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची घटना कळताच राठोड कुटुंबीय हादरले. दिनेशबरोबर संपर्कही होत नव्हता. रविवारी दुपारी सव्वा एक वाजता दिनेशचा फोन आला. आई लक्ष्मी, पत्नी कविता, भाऊ प्रकाश, सुरेश यांना सुखरूप असल्याचे सांगितले. सकाळी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने टीममधील सर्वांना सुरक्षितस्थळी आणले आहे.

एव्हरेस्ट मोहीम नेपाळचे शेर्पा यांच्या सहकार्यानेच पार पडते. नेपाळला मोठ्या भूकंपाचा धक्का बसल्याने यावर्षीची मोहीम रद्द होण्याची शक्यता आनंद बनसोडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रीय गिर्यारोहक सुरक्षित आहेत

औरंगाबादचे रफिक शेख पुण्याचा किशोर, मुंबईचे कुंथल सुरक्षित असून ते ‘गोरक्षेप’ या ठिकाणी आहेत. दिनेश राठोड तारकेश्वरी भालेराव यांच्याशी अद्याप संपर्क झाला नसला तरी ते सुखरूप खाली माउंट आयलँड शिखराकडे गेल्याचे रफिक शेख यांनी सांगितले. तर हिमालयीन माउंटनिअरिंग संस्थेचा कोर्स करण्यासाठी गेलेला अकलूजचा निहालही सुखरूप आहे.