आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक कर्ज घ्या पटापट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उच्च शिक्षणाची दारे खुली असताना केवळ पैशाअभावी हुशार विद्यार्थ्यांची अडचण होते. ती दूर करण्यासाठी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांच्या शैक्षणिक कर्जांच्या योजना आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांतून कमी व्याजदरात कर्जे मिळतील; परंतु जामीनदारांसह तारण आवश्यक आहे. सहकारी बँकांना मात्र दोन सक्षम जामीनदार हवे आहेत. एकूणच सर्व बँकांनी शंभर कोटी रुपये वितरित करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी जुलै ते ऑगस्ट अखेरपर्यंत प्रत्येक शाखेत स्वतंत्र शैक्षणिक कर्जांचे कक्षही उघडण्यात आले.

जनता बँकेची माध्यमिक शिक्षणासाठीही कर्ज योजना
सोलापूर जनता सहकारी बँकेने दुर्बल घटकांतील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी कर्ज योजना जाहीर केली. सातवी ते दहावीत शिकणार्‍या मुलांना त्यांच्या शैक्षणिक शुल्क, शिकवणी वर्गांसाठी 10 हजार रुपयांच्या र्मयादेत कर्ज मिळेल. त्याचे हप्तेही सामान्यांना परवडतील, अशाच पद्धतीचे आहेत. प्रामुख्याने विडी कामगारांच्या हुशार मुलांना ही कर्जे देण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेतील वरिष्ठ अधिकारी र्शीनिवास वल्लाकाटी यांनी सांगितले.

कर्जासाठी काय हवे आहे?
दोन लाखांच्या आतील रकमेसाठी दोन सक्षम जामीनदार
दोन लाखांच्या वरील रकमेसाठी जामीनदारांसह पुरेसे तारण
पालकांच्या उत्पन्नाचे पुरावे; तारणासाठी मालमत्तेची कागदपत्रे
शैक्षणिक संस्थांकडील शुल्क मागणीचे लेखी पत्र आवश्यक
परदेशातील शिक्षणासाठी सॉल्व्हन्सी (ऐपत) प्रमाणपत्र गरजेचे
किमान 60 टक्के गुण मिळवल्याच्या पत्रिकेची झेरॉक्स

30 लाख रुपये देणार
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वेगवेगळे व्याजदर आहेत. पदवी आणि पदविकेसाठी 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. परदेशातील शिक्षणासाठी 15 लाख रुपये देण्याची र्मयादा यंदापासून दुप्पट करण्यात आली आहे. त्यावर 11.45 टक्के व्याजदर आहे.’’ एम. ए. वझे, साहाय्यक सरव्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया

महाबँकेचे व्याजदर कमी
बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात कमी व्याजदरात (11.25 टक्के) शैक्षणिक कर्जे देते. सर्व शाखांमधून त्याच्या वितरणाचे नियोजन असून, त्यासाठी स्वतंत्र कक्षही सुरू आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी शाखाधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटूनच त्याची सविस्तर माहिती घ्यावी.’’ नील पाटील, विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र

यंदाही एक कोटीने वाढ
सोलापूर जनता सहकारी बँक शैक्षणिक कर्जांमध्ये दरवर्षी एक कोटी रुपयांची वाढ करत असते. गत वर्षात 6 कोटी 45 लाख रुपयांची कर्जे दिली. सर्व शाखांमधून कर्ज देण्यासाठी नियोजन केले आहे.’’ र्शीनिवास वल्लाकाटी, वरिष्ठ अधिकारी, सोलापूर जनता सहकारी बँक