आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational News In Marathi, Obc Student Can Free Admission In Private School, Divya Marathi

आर्थिक दुर्बल असाल, तर खासगी शाळेत मोफत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-येत्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक खासगी शाळांमधील पहिलीच्या पटापैकी 25 टक्के जागा दुर्बल घटकातील मुलांसाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. यामुळे अनुसूचित जाती-जमाती, अपंग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना नामांकित खासगी शाळेत मोफत सहज प्रवेश मिळण्याचा हक्क मिळाला आहे. पालकांना यासाठी येत्या 1 एप्रिलपासून मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज करावा लागणार आहे.

शहरातील अनुदानित, विनाअनुदानित नामांकित हरिभाई, नूमवि, सिद्धेश्वर, मॉडर्न यासह इंग्रजी माध्यमांच्या लिटल फ्लॉवर, सेंट थॉमस, सेंट जोसेफ अशा शाळांमधून संबंधित दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. शहरातील 160 शाळांमधून सुमारे 2500 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 11 एप्रिलपर्यंत पालकांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाकडे दररोज अहवाल सादर करावा लागेल, असे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी सांगितले.
उपलब्ध जागेच्या 25 टक्के जागा आहेत आरक्षित

अंतर बंधनावरून प्रवेश नाकारू नये
पालकांना घरांपासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या तीन शाळांची निवड करता येईल. त्यातील एका शाळेत प्रवेश दिला जाईल. एक किलोमीटरपर्यंतचा रहिवासी विद्यार्थी अर्जदार नसेल तर तीन किमी अंतरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. अंतरावरून प्राप्त विद्यार्थ्यास प्रवेश नाकारता येणार नसल्याचे प्रशासनाधिकारी कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया
1 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत पालकांनी शाळांमध्ये करावा अर्ज.
12 ते 15 एप्रिलला अर्जांची पडताळणी शाळा करेल
19 ते 25 एप्रिलपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल
शिल्लक जागा राहिल्यानंतरही पात्र विद्यार्थ्यास देता येईल प्रवेश.
27 एप्रिल रोजी मुख्याध्यापकांना द्यावा लागेल अहवाल.
पात्र विद्यार्थ्यांची शाळांमध्ये जाहीर होईल प्रवेशयादी.
शाळेत क्षमतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने प्रवेश

आरक्षणानुसार उपलब्ध जागा
पहिलीचा पट : 12020 025 टक्के आरक्षण प्रवेश : 3022 0अनु.जाती प्रवेश : 1189 0 अनु.जमाती प्रवेश : 294 0 अपंग बालके : 27