आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Corportors Meet State Election Commissioner

आठ नगरसेवकांनी घेतली राज्‍य निवडणूक आयुक्‍तांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नगरसेवकपद रद्द झालेल्या काँग्रेसच्या आठ जणांनी सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांची भेट घेतली. नगरसेवकांनी अँड. विश्वास देवकर यांच्यामार्फत बाजू मांडली. या वेळी शहर काँग्रेस अध्यक्ष धर्मा भोसले, आमदार दिलीप माने, नगरसेवक बाबा मिस्त्री आदी उपस्थित होते.

राज्य कार्यालयाने पुण्याच्या विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडून माहिती मागवून घेतली आहे. तर श्री. देशमुख यांना उद्या भेटून निर्णय मागे घेण्याची विनंती नगरसेवक करणार आहेत. निवडणूक खर्च वेळेत सादर केले नसल्याने काँग्रेसच्या आठ नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.


हे मांडले मुद्दे
निकालाच्या 30 दिवसांत 25 नगरसेवकांनी हिशेब दिलेला नाही.
फक्त आठ जणांचे पद रद्द का?
पद रद्द करताना आम्हाला सुनावणीस का बोलावले नाही?


30 दिवसांत हिशेब न दिलेले नगरसेवक
अविनाश बनसोडे, दमयंती भोसले, उदयशंकर चाकोते, संजीवनी कुलकर्णी, राजकुमार हंचाटे, श्रीदेवी फुलारे, रफीक हत्तुरे, कल्पना यादव, चेतन नरोटे, आरिफ शेख, देवेंद्र भंडारे, विनोद गायकवाड, सुजाता आकेन, परवीन इनामदार, रियाजअली हेंडेकरी, सारिका सुरवसे (सर्व काँग्रेस), सुनीता रोटे, हारून सय्यद, निर्मला जाधव, दिलीप कोल्हे, गीता मामड्याल, प्रवीण डोंगरे (सर्व राष्ट्रवादी), मनोज शेजवाल, मंगला वानकर (शिवसेना), शिवानंद पाटील (भाजप).


आयुक्तांनी मागवली माहिती
विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेकडून माहिती मागवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे आठ नगरसेवक विभागीय आयुक्तांना मंगळवारी सकाळी 11 वाजता भेटणार आहेत. 25 नगरसेवकांना नोटीस दिली असताना आम्हा आठ नगरसेवकांचेच पद रद्द का केले? त्यामुळे दिलेला निर्णय परत घ्यावा, अशी विनंती करणार असल्याची माहिती अँड. देवकर यांनी दिली.


अन्य काहींना नोटीस दिली का?
महापालिका निवडणूक 557 जणांनी लढवली. त्यापैकी 280 जणांनी 30 दिवसांच्या आत खर्च सादर केला नाही. त्यापैकी किती जणांना नोटीस दिली? यात तत्कालीन उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अनिल विपत यांनी काही जणांचेच हिशेब पाठवले, असा आरोप नगरसेवक सुरेश पाटील यांनी केला. त्यावेळी काही जणांनी प्रतिज्ञापत्र दिले ते पाठवल्याचे विपत म्हणाले.