आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोबळे, रश्मी बागल, गादेकरांसह २५ जणांनी भरला अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. बुधवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत होती. मोहोळ मतदारसंघातून वदि्यमान आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्यासह करमाळा मतदारसंघातून माजी मंत्री स्व. दिगंबर बागल यांची कन्या रश्मी बागल-कोलते यांनी इच्छुक म्हणून अर्ज भरला आहे. माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळा, दक्षिण साेलापूर ६ या मतदारसंघातून १८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
विद्यमान आमदारच नाहीत इच्छुक - जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अक्कलकोट, बार्शी व सांगोला मतदारसंघातून एकही इच्छुकांनी अर्ज दाखल केले नाहीत. माळशिरस, माढा, बार्शी या मतदारसंघाचे वदि्यमान आमदार राष्ट्रवादीचे आहेत, मात्र त्यांनी इच्छुक असल्याचा अर्ज दाखल केला नसल्याने ते यंदा इच्छुक नाहीत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. करमाळा मतदारसंघाच्या आमदार श्यामल बागल यांच्यािठकाणी कन्या रश्मी बागल यांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला आहे. शिवाय बागल समर्थक विलास घुमरे यांनीही इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला आहे.
मतदारसंघनिहाय इच्छुकांची नावे...
माेहोळ - आमदार लक्ष्मण ढोबळे, सभापती भारत गायकवाड, श्यामराव िभकाजी गायकवाड, अजय रेवणसदि्ध गायकवाड, राम भारत जगदाळे, अर्जुन अनंत वाघमारे.

माळशिरस - भारत कृष्णा गायकवाड, राजेश भगवान गुजर, अशोक हरी गायकवाड, प्रा. चांगदेव सुखदेव गायकवाड, सुनंदा सतीश काटे.

पंढरपूर - चंद्रकांत प्रभाकर बागल, अॅड. आनंद रामचंद्र शिंदे .
माढा - पांडुरंग यशवंतराव पाटील.

करमाळा - रश्मी दिगंबर बागल, विलासराव घुमरे व सविता शहाजीराजे राजेभोसले .
दक्षिण सोलापूर - बसवराज बगले, माजी परविहन सभापती विजय हत्तुरे, माजी नगरसेवक भोजराज पवार,
शहर मध्य - माजी महापौर मनोहर सपाटे, शहराध्यक्ष महेश गादेकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष वदि्या लोलगे .
शहर उत्तर - शहर उत्तर - माजी महापौर मनोहर सपाटे, शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी शहर युवकाध्यक्ष किसन जाधव व महेश निकंबे.
शहर मध्य व शहर उत्तरमधून मागणी
सोलापूर शहरातील तीनही मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहेत. यापैकी कोणताही एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची मागणी शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. इच्छुकांनी भरलेल्या अर्जामध्ये शहर उत्तर, शहर मध्य व दक्षिण सोलापूर या तिन्ही मतदारसंघातून महेश गादेकर, मनोहर सपाटे यांच्यासह ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
२६ ऑगस्ट रोजी मुलाखती
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज २१ ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्षांकडे जमा केले जाणार आहेत. प. महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबई येथे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती २६ ऑगस्ट राेजी होतील.