आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक खर्चासाठी काढावे लागेल बँकेत खाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - यंदा प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराला 20 हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च बँक खात्यातून करावा लागणार आहे. यासाठी निवडणुकीचा अर्ज संबंधित उमेदवाराने सादर करताना अर्जासोबत संबंधित बॅंकेचा नवीन खाते क्रमांक देणे बंधनकारक असेल. या खात्यातून होणार्‍या व्यवहाराचा रोजचा अहवाल निवडणूक अधिकार्‍यांना सादर करावा लागणार आहे. उमेदवारांकडून सादर होणारा खर्च पाहण्यासाठी माढा व सोलापूर मतदार संघासाठी केंद्रीय निरीक्षक सोलापुरात बुधवारी सायंकाळी दाखल झाले आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीत पैशाच्या वाढत्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना 70 लाख रुपयांची र्मयादा दिली आहे. सर्व खर्च बॅंकेतील खात्यातून करायचा आहे. होत असलेल्या खर्चाचा रोजच्या रोज आढावा घेण्यात येणार आहे. माढा व सोलापूर मतदार संघासाठी स्वतंत्र भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक खर्च पाहणीसाठी केंद्रीय निरीक्षक दाखल
निवडणूक खर्चाविषयी निवडणूक कार्यालयाने केलेल्या पाहणीसाठी बुधवारी सायंकाळी सोलापूर व माढासाठी निरीक्षक दाखल झाले. सोलापूरसाठी आयकर विभागाचे आयुक्त एस. के. चौधरी तर माढा मतदार संघासाठी आयकर विभागाचे उपायुक्त कमल खन्ना हे निरीक्षक दोन्ही लोकसभा मतदार संघात गुरुवारी बैठका घेणार आहेत. दोन्ही निरीक्षकांकडून 20 आणि 21 मार्च रोजी शिवाय दोन्ही मतदार संघाचा धावता आढावाही घेतला जाणार आहे.

निवडणूक अधिकारी गेडाम यांनी घेतली बैठक
रॅली, सभा खर्चाचे दर निश्चित केले आहेत. शिवाय भरारी पथकेही स्थापन केली आहेत. त्यांच्याकडून सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी खर्चाची माहिती योग्य व काटेकोरपणे द्यावी. उमेदवारांनी स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्याद्वारेच निवडणुकीचा खर्च सादर करावा. उपजिल्हा निवडणूक अधिकारी र्शीपती मोरे यांनी सभा, मिरवणूक, वाहन, हेलिकॉप्टर उतरवणे आदीबाबत कोणाकडून परवानगी घ्यावी, पोस्टर, झेंडा लावणे, दिल्या जाणार्‍या जाहिरातीविषयी सूचना केली.

खर्चावर करडी नजर
निवडणूक आयोगाने उमेदवारांना 20 हजारांवरील खर्च बॅंक खात्यातून करण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना नवीन खाते क्रमांक देणे बंधनकारक आहे. खात्यातून होणारा खर्च व प्रत्यक्षातील खर्च यावर नजर असेल. गौतम जगदाळे, प्रमुख, निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष