आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुंगी डान्स’, ‘साडीके फॉलसा..’ धूनवर रंगणार प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘लुंगी डान्स लुंगी डान्स..’ ‘साडी के फॉलसा तुझे मॅच कि या रे,’ ‘चिंताता चिता चिता’ या गीतांवर तर म्युझिकल आर्केस्ट्राचा रोड शो, बतावणीच्या धमाक्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार गाजणार आहे. चित्रपटातील गाजलेल्या गीतांच्या ट्रॅकवरून स्वतंत्र ट्रॅक तयार करणार्‍या सोलापुरातील स्थानिक कलावंतांनी 8 लाख खर्च करून ऑर्केस्ट्रा रथ बनविला आहे. या रथावरून विविध गीतांवर धून छेडत प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे.
ऑर्केस्ट्राचा नवा प्रकार
मधुरध्वनीचे संचालक अबुल हसन यांच्या कल्पनेतून प्रचाराचा हा नवा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. याकरिता स्थानिक कलावंतांच्या साहाय्याने प्रचार रथ तयार केला आहे. या संपूर्ण पॅकेजमधून बतावणी, गायक संघ, गाणी आणि संगीत सभा या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे. हा ऑर्केस्ट्रा रथ शहरात फिरवून रोड शोप्रमाणे प्रचार करता येणार आहे. ही संकल्पना मुंबई-पुणेनंतर पहिल्यांदाच सोलापुरात सुरू होत आहे.
सोलापूरच्या रेकॉर्डिंग क्षेत्रात गेली 30 ते 40 वर्षे काम करणारे मिलन रेकॉर्डिंग रूमचे संचालक हकीम शेख यांनी गाण्यांचे स्वतंत्र ट्रॅक तयार केले आहेत. येऊ तशी कशी मी नांदायला या पारंपरिक गीतासह राऊडी राठोड या नव्या चित्रपटातील चिंताता चिताता या गीतावर प्रचाराचे ट्रॅक तयार केले आहेत. अबुल हसन यांनी लुंगी डान्स लुंगी डान्स, साडी के फॉल सा तुझे मॅच किया रे या गीतांची बांधणी केली आहे.