आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादी; आता हवी छबी, अन्यथा नाव कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदार संघातील सुमारे नऊ लाख 70 हजार मतदारांपैकी तब्बल दोन लाख 70 हजार जणांची नावे नव्या मतदार यादीतून वगळण्याची भीती आहे. या मतदात्यांची छायाचित्रे नसल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

‘शहर मध्य’ची मोठी संख्या
‘शहर मध्य’ मध्ये याचे प्रमाण सर्वाधिक एक लाख दोन हजार आहे. ‘दक्षिण सोलापूर’मध्ये 83 हजार आणि ‘उत्तर सोलापूर’मध्ये 91 हजार जणांची छायाचित्रे नाहीत.

निवडणूक प्रशासनाने छायाचित्रे घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ती 30 जूनपर्यंत जारी राहणार आहे. राहिलेल्या जिल्ह्यातील आठ मतदार संघात पावणेसहा लाख जणांची छायाचित्रे नाहीत. यापैकी 16 हजार जणांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत छायाचित्र असणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. गुजरात व कर्नाटक निवडणुकांमध्ये छायाचित्रांसह मतदार यादीच ग्राह्य धरण्यात आली होती. 2014 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने मतदार यादीत नावं बंधनकारक आहेत. त्यामुळे मतदार याद्यांची दुरुस्ती सध्या सुरूआहे. एक एप्रिलपासून छायाचित्रे गोळा करण्याची मोहीम सुरू असून आतापर्यंत फक्त 41 हजार जणांची छायाचित्रे मिळाली.

अशी आहे स्थिती
मतदारसंघ छायाचित्र नसलेले मतदार
करमाळा 38, 791
माढा 31,433
बार्शी 31,786
मोहोळ 40, 959
उत्तर सोलापूर 91,258
शहर मध्य 1,02,020
अक्कलकोट 54,065
सोलापूर दक्षिण 83,934
पंढरपूर 37,471
सांगोला 26,086
माळशिरस 38,055

जिल्ह्यातील झाली 16 हजार मतदारांची नावे कमी
01 कोटी 45 लाख 63 हजार 480 राज्यातील मतदारांचे फोटो नाहीत
15 लाख 59 हजार 279 मतदारांचे छायाचित्र मिळाले
06 लाख 71 हजार नावे यादीतून वगळली

मतदारांनी हे करावे
मतदार यादीत छायाचित्र असल्याची खातरजमा मतदात्यांनी करावी. त्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत संपर्क साधावा. छायाचित्र नसल्यास पासपोर्ट आकाराचे छायाचित्र शाखेत जमा करावे.

डोळ्यात तेल घालून काम सुरू
छायाचित्रासह मतदार याद्यांसाठी सक्ती केलेली आहे. छायाचित्रे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरूआहे. त्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. वारंवार आवाहन केले आहे. मतदारांसाठी ही शेवटची संधी असून छायाचित्रे नसणार्‍यांची नावे यादीतून वगळण्यात येतील.’’ र्शीपती मोरे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा