आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘राजकारणी' शिक्षकांना आयोगाने लावला चाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामीणभागातील राजकारण स्वत:भोवती वलयांकित करणाऱ्या राजकारणी शिक्षकांना निवडणूक आयोगाने चाप लावला आहे. शिक्षकांनाही आता आचारसंहिता लागू झाली आहे. कुणाच्याही प्रचारसभेत अथवा रॅलीत शिक्षक सहभागी झालेले दिसले तर त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाचे हे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी शैक्षणिक संस्थांनाही लागू राहणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांशी नाळ जुळलेल्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांकडून संस्थाचालक बळजबरीने प्रचार करवून घेतात. निवडणूक आयोगाच्या ही बाब ध्यानात आली. त्यामुळे राजकारण्यांचे हितचिंतक बनलेल्या या शिक्षकांना प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी आयोगाने कठोर पावले उचलली आहेत. निवडणूक आयोगाच्या या कठोर भूमिकेमुळे शिक्षकांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
खातेनिहायचौकशी होणार
एखादाशिक्षक एखाद्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत अथवा सभेत दिसून आला तर त्या शिक्षकाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सदर चौकशीत दोष सिद्ध झाल्यास त्यांना तत्काळ निलंबित करण्याचेही आयोगाने आदेशित केले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या सभेत उपस्थिती कुणाची आहे, या संदर्भात येथील तलाठी, ग्रामसेवक यांना व्हीडीओ कॅसेट तपासणीसाठी देण्यात येणार आहेत. यात शिक्षक अथवा कोणताही शासकीय कर्मचारी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
निर्णय योग्य, पण अन्यायही होण्याची शक्यता
निर्णय योग्य आहे, मात्र यामध्ये थोडी शिथीलता हवी. काही शाळा राजकारणांच्या आहे. जरी शाळेचे काम करत असले तरी कुणाकडून काही चूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांवर अन्यायही होण्याची शक्यता असते. यापूर्वी फक्त जिल्हा परिषदेच्या शाळांना आदेश होता. आता खाजगी संस्थांनाही हा नियम लागू केला आहे.’’ सुनीलचव्हाण, जिल्हाध्यक्ष,डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना