आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेपूर्वीच जिल्ह्यात उलथापालथीचीनांदी चिठ्ठीचा कौल;दक्षिण सोलापूर काँग्रेसच्या बंडखोर गटाकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली असताना झालेल्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीत वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला मोठे धक्के बसले. येणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या सत्तांतराचीच चुणूक यातून दिसून आल्याच्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
माळशिरस पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला तर बार्शीत काँग्रेसला पंचायत समितीमधील सत्तेतून बाहेर जावे लागले आहे. त्याचा फायदा महायुतीला झाला. गेल्या ५२ वर्षांपासून माळशिरस पंचायत समिती मोहिते यांच्या वर्चस्वाखाली होती. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम असल्याचे चित्र होते. पण आजच्या निकालाने मोहिते गटाला मोठा धक्का बसला आहे.

गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत सभापतिपद राष्ट्रवादीने टिकवले होते पण उपसभापतिपद चिठ्ठीच्या कौलामुळे स्वाभिमानी संघटनेकडे गेले होते. या वेळी सभापती अणि उपसभापती ही दोन्ही पदे गेल्याने स्वत:च्या तालुक्यातच मोहिते यांची राजकीय कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीचे दोन सदस्य फुटल्याने ही अडचण झाली. येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने पंचायत समितीमधील घडामोड खूप काही सांगून जाणारी असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचीच सत्ता रािहली असली तरी तेथे पक्षांतर्गत गटबाजीने आमदार दिलीप माने गट माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके राष्ट्रवादीचे बसवराज बगले, श्रीशैल नरोळे गट यांचे पारडे समसमान झाल्याने चिठ्ठीद्वारे निवड केली गेली.
चिठ्ठीनेही बंडखोर गटालाच साथ दिली. त्यामुळे आमदार माने काँग्रेस कमिटीला जोरदार धक्का बसला. तत्पूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी नेत्यांशी बोलून सभापती पदासाठीचा लखोटा दिला. पण, त्यातील नावे धुडकावून तालुकाध्यक्ष गुरुनाथ म्हेत्रे यांनीच बंडखोरी करीत सभापतिपदाची निवडणूक लढवली. पण, दिलीप माने यांनीही ताकद लावल्याने समसमान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीचा कौल घेतला गेला. माने यांना विधानसभेत घेण्यासाठी तयार झालेल्या काँग्रेसमधील दुसऱ्या गटाने आज बाजी मारली. त्याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटू लागले आहेत.

बार्शी आणि पंढरपूर पंचायत समित्या आयत्याच महायुतीला मिळाल्या. बार्शीत काँग्रेसची सत्ता होती. पण राजेंद्र राऊत यांचा गट शिवसेनेत गेल्याने त्यांच्यासमवेत सर्वच सदस्यही शिवसेनेत गेल्याने आज भगवा फडकला. शिवसेनेला तेथे आयती सत्ता मिळाली. दिलीप सोपल गट पुन्हा विरोधातच राहिला. तर पंढरपुरातही हाच अनुभव आला. प्रशांत परिचारक यांनी स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून महायुतीत प्रवेश केल्याने तेथे परिचारक गट आणि स्वाभिमानी संघटनेने पंचायत समितीवर आपले वर्चस्व ठेवले. परिचारक गटच महायुतीत गेल्याने पंढरपूर पंचायत समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपल्यात जमा आहे.

काही ठिकाणी आघाडीला दिलासा
एकीकडेविधानसभा निकालापूर्वीच विरोधकांना ‘दिवाळी’ साजरी करण्याची संधी मिळाली असताना दुसरीकडे सांगोला, माढा, करमाळा, अक्कलकोट या तालुक्यांमधून अनुक्रमे शेकाप (गणपतराव देशमुख), राष्ट्रवादी (आमदार बबनराव िशंदे ), राष्ट्रवादी काँग्रेस (श्यामल बागल) काँग्रेस (सिद्धाराम म्हेत्रे) यांना दिलासा मिळाला आहे. तेथे त्यांना आपली सत्ता टिकवता आली आहे. हीच काय ती आघाडीसाठी जमेची बाजू आहे. अन्यथा जिल्ह्यातील आजचे निकाल विधानसभा निकालापूर्वीच महायुतीचे संकेत देणारे ठरले आहेत.