आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभेसाठी आजपासून रणसंग्राम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्याच्या१२ व्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. शनिवारपासून (दि. २०) सकाळी ११ ते या कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. २७ सप्टेंबर अंितम मुदत आहे. आघाडी महायुतीचे अद्याप जागा वाटपातच घोडे अडल्याने शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

तहसीलकार्यालयात अर्ज स्वीकारण्याची सोय
सोलापूरजिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. दक्षिण सोलापूर, शहर मध्य शहर उत्तर या तीन मतदारसंघांसाठी शहरात अर्ज स्वीकारण्यात येतील. शहर मध्य मतदारसंघाचे उमेदवारी अर्ज उत्तर तहसील कार्यालयात, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दक्षिण साेलापूर तहसील कार्यालयात तर शहर उत्तर मतदारसंघातील उमेदवारी अर्ज करमणूक कर कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. इतर मतदारसंघासाठी संबंिधत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी निवडणूक कार्यालयाकडून विशेष सूचनाही देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना अर्ज विनामूल्य असून, सूचनापत्राची िकंमत १०० रुपये आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात फक्त वाहने आणण्यास मनाई असून निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारासह व्यक्तींना परवानगी राहणार आहे.

कार्यालये सज्ज...
शहरातीलतिन्ही मतदारसंघांतील निवडणूक कार्यालये सज्ज करण्यात आली आहेत. शनिवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सर्व ठिकाणी कर्मचारी नियुक्त केल्याचे चित्र होते. निवडणुकीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच खिडकीतून देण्यात येणार असल्याचे याठिकाणी कर्मचारी नियुक्त केले होते. शिवाय प्रत्येक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे िनयुक्त केले आहेत.

ई-मेल सोशल मीडिया अकाउंटची माहिती द्यावी
निवडणूकआयोगाने यंदा प्रथमच विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास ई-मेल आयडी सोशल मीडिया अकाउंटची माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय उमेदवारी अर्जातील प्रत्येक रकाना भरणे आवश्यक असून उमेदवारी अर्जासोबत नवीन काढलेले बँक खाते देणे बंधनकारक असल्याचे निवडणूक अधिकारी शहाजी पवार यांनी सांिगतले.
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात शुक्रवारी रात्री उशिरा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले कर्मचारी.

*नामनिर्देशन पत्र ए,
*ओळखपत्रासाठी दोन फोटो,
*शपथपत्र फॉर्म २६,
*उमेदवार मतदारसंघाबाहेरील असल्यास मतदार यादीची सत्यप्रत
*स्वाक्षरी नमुना पत्र
*अनामत रकमेची पावती,
*सक्षम अधिकारी यांचे समक्ष शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र,
*विहित नमुन्यातील तपशीलवार माहिती, बँक खाते क्रमांक पत्र,
*मतपत्रिकेवर द्यावयाचे उमेदवाराच्या नावाचे नमुना पत्र.