आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेला लाट भाजपची; गर्दी सेनेकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्ष हा महायुतीचा एक घटकपक्ष म्हणून सामोरा जात आहे. जिल्ह्यातील अकरापैकी तीनच जागा भाजपच्या वाट्याला आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट दिसून आली. तरीही त्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेला भरती आल्याचे चित्र आहे. त्यामुळे विधानसभेसाठी जिल्ह्यात जागा वाढवून घेण्यासाठी भाजप आग्रही आहे. विशेषत: दक्षिण सोलापूरच्या जागेसाठी माजी खासदार देशमुख यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यामार्फत प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपच्या वाट्यातील तीन मतदारसंघांपैकी शहर उत्तर आणि अक्कलकोट अशा दोन्ही भाजपच्या ताब्यात आहेत, माळशिरससाठी भाजपकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे शहर उत्तर आणि अक्कलकोटमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
माळशिरसची जागा महायुतीच्या घटकपक्षाकडे जाण्याची शक्यता
माळशिरस विधनासभा मतदार संघात मागील निवडणुकीत माजी मंत्री दिलीप कांबळे यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर त्या मतदार संघात पक्षाची ताकद वाढली नाही. ती जागा राखीव असल्याने महायुतीच्या घटकपक्षांपैकी स्वाभीमान संघटना किंवा रिपाइं (आठवले गट) यांच्याकडे देण्यास भारतीय जनता पक्ष अनुकूल असल्याचे दिसत आहे.

सुभाष देशमुख आग्रही
सुभाष देशमुख यांच्याकडे भंडारकवठे येथील साखर कारखाना आहे. त्यामुळे त्यांनी दक्षिण सोलापूरसाठी आग्रह धरला आहे. लोकसभेतील त्यांची संदिग्ध भूमिका पाहता त्यांना विरोध झाला तर शहाजी पवार निवडणूक लढण्यास तयार असतील. नगरसेवक नरेंद्र काळे यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. मागील विधानसेभेत सेनेला चांगली मते मिळाली होती. त्यामुळे ही जागा सेना सहजासहजी सोडणार नाही.

महायुतीतील आधीचे जागावाटप
भाजपकडे : माळशिरस, अक्कलकोट, शहर उत्तर. शिवसेनेकडे : बाश्री, पंढरपूर, सांगोला, माढा, बाश्री, मोहोळ, दक्षिण सोलापूर, करमाळा.