आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election Of Two Seats Of Solapur Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोठे हे कोट्यधीश, चिनींकडे रोकड ५००

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत आठ जण रिंगणात असून, त्यात सर्वात धनवान महेश कोठे आहेत. त्यांच्या नावाने १४ बँकेत खाते असून, आठ शेतजमीन आहे तर चार ठिकाणी खुली जागा चार ठिकाणी घरे आहेत. प्रभाग १८ च्या पोटनिवडणुकसाठी मनपा निवडणूक शाखेत दिलेल्या शपथपत्रात मालमत्ता नमूद करण्यात आली आहे. अर्जासोबतच्या शपथपत्रानुसार कोठे हे कोट्यधीश आहेत. तर कोठे यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे कृष्णाजी चिनी यांच्याकडे ५०० रुपये, पत्नीकडे दहा ग्रँम सोने आहे.
संपत्तीत वाढ नाही
विधानसभा निवडणूक आणि महापालिका पोटनिवडणूक यात दहा महिन्यांचा कालावधी असून, या काळात कोठे यांच्या संपत्तीत फारशी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत नाही.
मतदान केंद्र यादी प्रसिद्ध
दोनप्रभाग मिळून २२ मतदान केंद्रे असून, त्यांची यादी निवडणूक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांना हुतात्मा स्मृती मंदिर येथे मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले.
चिन्ह वाटप
दोन प्रभागातील आठ जणांना मतदान करण्यासाठी चिन्ह वाटप करण्यात आले.
प्रभाग चार कांता भोसले (कमळ), पद्मावती गज्जम (हात), अनिता साळुंके (पतंग).
प्रभाग १८ कृष्णाहरी चिनी (हात), महेश कोठे (धनुष्यबाण), मल्लिकार्जुन कोंका (जग), इरफान शेख (गॅस सिलिंडर), म. युसूफ शेख (हातोडा, विळा,तारा).
रोकड : १.३५लाख १४बँकेत जमा : ११,५८,४०८
वाहने: जीप(एमएच १३ एन ५२०२), मारुती कार (एनएच १३ एन ५३०२)
कृषी जमीन : सलगरवस्ती(४.०४ एकर विष्णुपंत कोठे समवेत हिस्सा), गंगेवाडी (२१.४६ एकर), कासेगाव (९.८९ एकर), मुस्ती (दोन एकर), दारेपल्ली (ता. यादगिरी गुट्टा, तेलंगणा (४ एकर). अकृषिक जमीन : मुरारजीपेठ, लक्ष्मी पेठ, महिबूब नगर तेलंगणा.
घरे: पूर्वमंगळवार पेठ (३५०३ २८५६ चौ.फू.), मुरारजी पेठ, मजरेवाडी, सातारा, पुणे.
कर्ज: कराड बँक (९९.१६ लाख), समर्थ बँक (२.०४ काेटी), नागरी ओै. बँक (४६.०३ लाख, सर्व संयुक्त).
- पत्नी नम्रता यांच्याकडे ३० तोळे सोने, २१ हजार, शेती
- मुलगा प्रथमेश यांच्याकडे साडेतीन हजार रुपये, २१ हजार रुपये बँकेत, पाच तोळे दागिने