आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Returning Officer,latest News In Divya Marathi

आमदार माने, शिंदेंसह 15 उमेदवारांना नोटिसा, ऑक्टोबरपर्यंतच्या खर्चाची केली तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- प्रचारसभा, पदयात्रा यावर केलेल्या खर्चामध्ये तफावत निघाल्याप्रकरणी दक्षिण सोलापूरमधील 9, शहर मध्य मतदारसंघातील तर शहर उत्तर मतदारसंघातील एका उमेदवाराला नोटीस देण्यात आली आहे.48 तासांमध्ये नोटिसीला उत्तर दिल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते सप्टेंबरपर्यंत उमेदवारांनी केलेल्या खर्चाची तपासणी गुरुवार दि. ऑक्टोबर रोजी खर्च निरीक्षकांसमोर करण्यात आली. दक्षिण सोलापूर, शहर मध्य शहर उत्तर या तीन मतदारसंघांतील प्रमुख उमेदवारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. शहर मध्यमधील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या खर्चात लाख ८७ हजार ५१३, माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या खर्चात ७२ हजार ३४५, शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांच्या खर्चात ४७ हजार ३५८, एमआयएमचे उमेदवार तौफिक शेख यांच्या खर्चात ८६ हजार ४०५ तर राष्ट्रवादीच्या उमेदवार विद्या लोलगे यांच्या खर्चामध्ये हजार ८२२ तफावत निघाली आहे. शहर उत्तर मधील काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ चाकोते यांच्या खर्चात ७३ हजार ५७३ रुपयांची तफावत निघाली आहे.
दक्षिण सोलापूरमधील उमेदवारांना नोिटसा देण्यात आल्या आहेत. आमदार दिलीप माने यांच्या खर्चात ३५ हजार ९५७, शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर यांच्या खर्चात लाख ८९ हजार १२५, भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या खर्चात लाख ८६ हजार ९३५, राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब शेळके यांच्या खर्चात ३३ हजार २०९ रुपये, मनसेचे उमेदवार युवराज चंुबळकर यांच्या खर्चामध्ये लाख ८७ हजार ४०१ रुपये तफावत निघाली आहे.
वानकर, चुंबळकर यांना नोटीस
दक्षिणसोलापूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गणेश वानकर मनसेचे उमेदवार युवराज चुंबळकर यांना पेडन्यूजप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. पेडन्यूजचा खर्च आपल्या निवडणूक खर्चामध्ये का पकडण्यात येऊ नये? अशी विचारणा नोटिसीमध्ये केली आहे. याप्रकरणी खुलासा आल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे.