आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Settlement, Green India,latest News In Divya Marathi

जिल्हा पोलिसांनी दिली 8500 जणांना नोटीस, मंत्री, महत्त्वाच्या व्यक्तींच्या सभेमुळे बंदोबस्त नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हापोलिस निवडणूक बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. सुमारे ८५०० लोकांना रेकॉर्डवरील संशयितांना प्रतिबंधात्मक नोटीस दिली आहे. त्यातील दीड तो दोन हजार लोकांना मतदानाच्या अगोदर दोन दिवस जिल्ह्याबाहेर धाडण्यात येणार आहे. अनुचित प्रकार अथवा कायदा सुव्यस्था अबाधित राहवी, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय येत्या रविवारपर्यंत जिल्ह्यात सर्वच पक्षाच्या महत्त्वाच्या व्यक्ती, मंत्री यांच्या सभा होणार असल्यामुळे तालुकानिहाय तयारी, बंदोबस्त नियोजन होत आहे. बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यातील एसआरपी, सीआयएसएफ, बीएसएफ पथके येणार आहेत. दोन-तीन तुकड्या दाखलही झाल्या आहेत. ग्रामीण, शहर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून हातभट्टी, दारू अड्ड्यांवर छापा मारून कारवाई करत आहेत.
तयारी आली अंतिम टप्प्यात
निवडणुकीसाठीपोलिस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह बाहेरील पॅरामिलिटरी फोर्स मागवण्यात आली आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. दत्तात्रयमंडलिक, पोलिसअधीक्षक
शहरात नाकाबंदी सुरू
शहरातहीरात्री पहाटे नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम घेण्यात येत आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढणे, तपासणी करणे ही कामे पोलिसांकडून सुरू आहेत. छत्तीसगड राज्यस्थानचा फोर्स आल्या आहेत. चंदीगडहूनही आणखी एक फोर्स येणार आहे. शनिवारपासून बंदोबस्त आणखी सक्षमपण केला जाईल. शर्मिष्ठाघारगे, साहाय्यकपोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
ठळक मुद्दे...
दोन हजार जणांना मतदानादिवशी जिल्हाबंदी
ग्रामीण पोलिस ठाण्यानुसार बैठका, नियोजन
परराज्यातून आलेला फोर्स संवेदनशील ठिकाणी नेमणार
रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचे खास लक्ष
मुख्य महामार्ग, कर्नाटक, महाराष्ट्र सीमेवर पेट्रोलिंग, गस्त पथक, पोलिसांचा बंदोबस्त अंतिम नियोजनाचे काम सुरू