आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election Started Therefore Rally Has Been Ban Issue At Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुक प्रक्रियेस झाला प्रारंभ; ५५ ठिकाणी सभांना अटकाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानसभानविडणुकीची तयारी पूर्ण झाली असून प्रत्येक मतदारसंघात कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे, अशी माहिती नविडणूक अधकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकारांना दिली. नविडणुकीसाठी ११ निर्णय अधिकाऱ्यांसह २३ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच १८ नोडल अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली असल्याचे गेडाम यांनी सांगितले.

धनादेशाचावापर करा
उमेदवाराने नविडणुकीसाठी स्वतंत्र बँक खात्यातून व्यवहार करावा. २० हजार रुपयांपेक्षा अधिकचा व्यवहार धनादेशाने करावा. यापेक्षा अधिक रोकड बाळगायची असल्यास त्याच्याविषयीची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक आहे. मागील लोकसभा नविडणुकीत एटीएममध्ये भरण्यात येणारी रक्कम पकडण्यात आली होती. अशी रक्कम जात असेल तर बँकेने संबंधित नविडणूक अधिकारी यांना कळवावे. यासंबंधी बँक अधिकाऱ्यांना पत्र दिले जाणार आहे.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय येथे पोलिसांनी वाहनांना अटकाव केल्यामुळे अशी गर्दी झाली होती.

पाहणी करून नियोजन
दक्षिण,उत्तर तहसील कार्यालयाजवळ वाहनांची गर्दी होत असेल तर त्याची पाहणी करू. नियोजन करून पर्यायी मार्गावरून वाहने सोडण्यात येतील. वाहतूक बंद अथवा सुरू याबाबत नागरिकांना सूचना दिल्या जातील.'' अश्विनीसानप, पोलिसउपायुक्त
५६ केंद्रे तर ८४ केंद्रांच्या नावात बदलचा प्रस्ताव
जिल्ह्यातील५६ मतदान केंद्रे तर ८४ इमारतीचे नाव बदलण्याचे प्रस्ताव नविडणूक कार्यालयास पाठवण्यात आले आहेत. बार्शी ६, मोहोळ, उत्तर सोलापूर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर प्रत्येकी ४, अक्कलकोट ७, पंढरपूर सांगोला तर माळशिरस १७ असे एकूण ५६ इमारत बदलाचे प्रस्ताव आहेत. इमारतीचे नाव बदलामध्ये करमाळा १०, मोहोळ १, शहर मध्य १६, अक्कलकोट ४, दक्षिण सोलापूर ९, सांगोला माळशिरस ३५ असे एकूण ८४ प्रस्ताव देण्यात आले आहेत. आयोगाकडून सूचना आल्यानंतर अंमल करण्यात येईल.
आचारसंहिता भंगाची तक्रार येथे
करमाळा: ०२१८२ २२२१५८, ९०२१५६३५२२, माढा : ०२१८३ २३४०३१, ९८५०८०८५७६, बार्शी : ०२१८४ २२२२१३, ९६२३५०७९७९, मोहोळ : ०२१८९ २३२२३४, सोलापूर शहर मध्य : ०२१७ २७३१०१४, ९८२३१८३००३, शहर उत्तर : ०२१७ २७३१०२०, ७५८८०४६५०३, अक्कलकोट : ०२१८ २३३१५८९, दक्षिण सोलापूर : ०२१७ २६२२८९९, ९८२३०३६०९०, पंढरपूर : ०२१८६ २२३९००, सांगोला : ०२१८७ २२०२१८, ९०४९००१४५५, माळशिरस : ०२१८५ २३५१९६, ७५८८१६४९०१, जिल्हाधिकारी कार्यालय : ०२१७ २६२०२२८.
सोलापूर विधानसभानविडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्यास शनविारपासून प्रारंभ झाला आहे. परंतु दक्षिण उत्तर तहसील कार्यालयासमोर सुमारे शंभर मीटर परिसरात वाहनांना बंदी घातल्याने आज दिवसभर वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे अर्ज घेण्यास आलेल्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांचे हाल झाले.

विधानसभा नविडणुकीच्या प्रक्रियेस शनविारपासून प्रारंभ झाला. त्यामुळे दक्षिण तहसील उत्तर तहसील (जुने कंकूबाई दवाखान्याजवळ) इच्छुक उमेदवारांची अर्ज घेण्यासाठी गर्दी झाली होती. दरम्यान वाहनांची गर्दी होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुमारे शंभर मीटर परिसर वाहनांसाठी बंदी आणली आहे. त्यामुळे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात वाहने नेता आली नाहीत. एकामागोमाग वाहनांची गर्दी वाढल्यामुळे फिरून जाताही येत नव्हते.
त्यामुळे गर्दी वाढत गेली.
दक्षिणप्रमाणेच उत्तर तहसील कार्यालयासमोरही अशीच स्थिती होती. बेडरपुलावरून सवि्हिल चौकाकडे जाणारा मार्गही बंद होता. सवि्हिल हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या नागरिकांना रस्ता बंद असल्यामुळे तहसील कार्यालयाच्या पाठीमागून, कोर्टजवळून सवि्हिल चौकात ये-जा करावी लागत होती. याबाबत पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांना विचारले असता रवविारी नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.