आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणुकीची कामे शिक्षकांना करावी लागणारच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निवडणुकीसंबंधी मतदार नोंदणी करणे, नोंदणी अर्ज घेणे, नावामध्ये दुरुस्ती करणे ही कामे करण्यासाठी जिल्हा परिषद महापालिका प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर शिक्षण संचालक महावीर माने यांनी प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त केले आहे, त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे पत्रच मनपा आयुक्त जिल्हा परिषद सीईओंना दिले आहे. या पत्रावरून मनपा प्रशासन अधिकारी यांनी उत्तर तहसीलदार यांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीचे काम करावे लागणारच असल्याचे सांगितले. यामुळे शिक्षक आता शिक्षण संचालकांचा आदेश मानणार की जिल्हाधिकार्‍यांचा, असा प्रश्न आहे.

शिक्षण संचालक माने यांनी दिलेल्या पत्रामध्ये शिक्षकांना जनगणना, नैसर्गिक आपत्ती, लोकसभा विधानसभा निवडणूक वगळता इतर कोणतीही कामे देऊ नये, असे नमूद केले आहे. मनपा प्रशासन अधिकारी यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, "सध्या सर्व शाळातून पटनोंदणी पंधरवडा सुरू आहे, विद्यार्थ्यांची संख्या टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच वार्षिक परीक्षा नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण द्यायचे असल्याने बीएलओ म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे.'

रद्द करण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगाला
शिक्षकांना बीएलओ म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नियुक्त केले आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेश रद्द करण्याचे अधिकार फक्त राज्य निवडणूक आयोगाला आहेत. कार्यमुक्त करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी काढले असले तरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मतदार नोंदणीचे काम करावेच लागणार आहे. तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी
बातम्या आणखी आहेत...