आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्‍ट्रानिक्स डीलर असोसिएशनचे ‘इलेक्ट्रो’ प्रदर्शन 24 जानेवारीपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर इलेक्‍ट्रानिक्स डीलर असोसिएशनच्या वतीने 24 ते 29 जानेवारी दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ‘इलेक्ट्रो 2014’ प्रदर्शन आयोजिले आहे. बजाज फायनान्सचे विभागीय व्यवस्थापक राकेश वर्मा प्रमुख पाहुणे असतील. एकूण 272 स्टॉल असणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत. हे प्रदर्शन दुपारी 4 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या 15 वर्षापासून प्रदर्शन भरवले जाते. विशेष योजना, भेट व कर्जपुरवठय़ाची सोयही आहे.

प्रमुख आकर्षण :

लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाइल, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईटी व एलसीडी टीव्ही. मिक्सर, मायक्रोओवर, व्हिडिओ गेम्स, कॅमेरा, हॅंन्डीकॉम, टॅबलेट, ए.सी, होमथिएटर, इस्त्री, घड्याळ आदी नवीन वस्तू व उत्पादने असणार आहेत.
एकाच छताखाली सर्व वस्तू

सोलापूरकरांसाठी सर्व इलेक्ट्रांनिक वस्तू एकाचा छाताखाली मिळणारी बाजारपेठ इलेक्ट्रोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्राहकांसाठी ही एक विशेष संधी आहे. मेट्रोसिटीमध्ये ज्या पध्दतीने प्रदर्शन भरवले जाते त्याच पद्धतीने हे प्रदर्शन आहे. सर्व सोलापूरकंरानी याचा फायदा घ्यावा.’’ विपीन कुलकर्णी, अध्यक्ष, सोलापूर इलेक्ट्रानिक्स डीलर असोसिएशन

ग्राहकांची सोय

सोलापूर शहरातही जागतिक दर्जाचे उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. ती पोहोचावी हा उद्देश प्रदर्शनाचा आहे. गेल्या वर्षी 1 लाख लोकांनी भेट दिली होती. यंदा त्याहीपेक्षा जास्त लोक भेट देतील अशी अशा आहे.’’ केतन शहा, चेअरमन , सोलापूर इलेक्ट्रॅनिक्स डीलर असोसिएशन

रक्तदान शिबिराचे आयोजन : सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून इलेक्ट्रो प्रदर्शनामध्ये असोसिएशनच्या वतीने सलग 6 दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामध्ये दमाणी ब्लड बॅंक आणि अश्विन ब्लड बॅंकचा सहभाग आहे.

शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश : शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आहे. यासाठी शाळा व महाविद्यालयाची परवानगी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन 4 ते 6 यावेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.