आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: ‘इलेक्ट्रो’तून सुमारे पाच कोटींची उलाढाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनच्या (सेडा) वतीने आयोजित इलेक्ट्रो 2013 प्रदर्शनात गेल्या सहा दिवसांमध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती ‘सेडा’चे सदस्य शिवप्रकाश चव्हाण यांनी दिली. रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक सुशील गायकवाड यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री समारोप झाला.

पॅनासॉनिक कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अजितेश स्वरूप, सेडाचे अध्यक्ष समीर गांधी, उपाध्यक्ष बिपीन कुलकर्णी, सचिव सचिन करवा, सहसचिव खुशाल देढिया, खजिनदार सुरजरतन धूत, सतीश मालू, केतन शाह, आनंदराज डोसी, नंदकुमार आहुजा, पराग शाह, दिलीप राऊत, संदेश कोठारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले.

प्रदर्शनात विविध प्रकारची उत्पादने असली तरीही यात सर्वाधिक मागणी होम अप्लायन्सला होती. होम अप्लायन्समध्ये गॅस शेगडी, इंडक्शन कुकर, इस्त्री, लॅपटॉप, कॉम्प्युटर आदी उत्पादनांना सर्वाधिक मागणी होती.

बेस्ट ऑफ दी बेस्ट स्टॉल
प्रदर्शनात सहभागी स्टॉलधारकांना उत्तेजन मिळावे म्हणून बेस्ट ऑफ दि बेस्ट स्टॉलने गौरवले जाते. यंदाच्या वर्षी केतन शहा यांच्या महिन्द्रा इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टॉलला बेस्ट ऑफ दी बेस्टने गौरवण्यात आले.