आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्‍ट्रो प्रदर्शनत नऊ लाखांचा 84 इंची टीव्ही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-सोलापूर इलेक्ट्रिकल्स् डिलर्स असोसिएशनच्या इलेक्ट्रो 2014 प्रदर्शनास लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. पडल्यानंतरही न फुटणारा मोबाइल, सेफ लॉकर्स, नऊ लाखांचा टीव्ही संच आणि एक मिनिटात खाद्यपदार्थ बनवणारा ओव्हन आदी वस्तू उपलब्ध आहेत.
24 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्रदर्शनात विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या कंपन्या आणि विक्रेते यांची दालने आहेत. नव्यानेच दाखल जी वन मोबाइल संचला गोरीला कंपनीची काच असून ती न फुटणारी आहे. मर्फी-रिचर्डस् कंपनीचा टेबल फॅन, मॅक्सेल कंपनीचा इ सेफ विक्रीस आला आहे. डोअर फोन कॉलर, सीसीटीव्ही सेट, आदी वस्तूही आहेत. 50 रुपयांपासून 12 लाख रुपयांपर्यंतच्या वस्तू आहेत. फूट मसाजर, मोबाइल, कॉम्प्युटर अँक्सेसरीज, मिक्सर्स, इंडक्शन कुकर्स, सोलर हिटर, डोंगल्स्, मोडेम्स्, आटाचक्की असे विविध प्रकारच्या गृहोपयोगी तसेच व्यवसायाला आवश्यक कॅशट्रॉन, बिलिंग, सॉफ्टवेअर्स मशीन आहेत.
नऊ लाख रुपयांचा टीव्ही संच
लॉइड कंपनीचा 84 इंची टीव्ही संच असून यात थ्रीडी, अल्ट्रा एच डी, वायरलेस वायफाय, यूएसबी स्लॉट, एचडीएमआय आदी सुविधा उपलब्ध आहेत. तो नऊ लाखांना आहे. गोदरेजचा जीएमई 25जीपी वन हा ओव्हन बहुतेकांना भावतोय. एका मिनिटात पदार्थ बनवण्याची, डबलडोअर, पिझ्झा अँड कबाब मेकर, चाइल्ड लॉक, तीन वर्ष वारंटी आणि 25 लिटरचा रॅक ही याची वैशिष्ट्ये आहेत.
फोर के टीव्ही
आधुनिक फोर के टीव्ही संच आलेला आहे. ट्रिल्युमिनस डिस्प्ले, मॅग्नेटिक फ्यूएड स्पिकर्स आदी सोय आहे. मॉडेलनुसार सव्वातीन लाखांपासून किंमत आहे.
इलेक्ट्रो प्रदर्शनामधील 84 इंची 9 लाखांचा टिव्ही.