आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Electro' S Inauguration On Friday Six Days Of Work Performance

‘इलेक्ट्रो’चे शुक्रवारी उद्घाटन- सहा दिवस चालणार प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनतर्फे (सेडा) इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन व होम अँप्लायन्सेस वस्तूंचे ‘इलक्ट्रो 2014’ प्रदर्शन येत्या 24 जानेवारीपासून ह. दे. प्रशाला व नूमवी प्रशालेच्या मैदानावर भरणार असल्याची माहिती ‘सेडा’चे अध्यक्ष विपीन कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

इलेक्ट्रो प्रदर्शनाचे यंदाचे 15 वे वर्ष आहे. शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी पाच वाजता हायर इंडिया कंपनीचे विभागीय व्यवस्थापक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या वेळी बजाज फायनान्सचे राकेश वर्मा उपस्थित राहणार आहेत.

सहा दिवस चालणारे हे प्रदर्शन दररोज दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी (दि. 26) सकाळी 11 ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये 275 पेक्षा विविध नामांकित कंपन्यांचे विक्री स्टॉल आहेत. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष कौशिक शहा, सचिव विश्वजित कुलकर्णी, सहसचिव खुशाल देढिया, खनिजदार दीपक मुनोत, सतीश मालू, शिवप्रकाश चव्हाण, जितेंद्र राठी, केतन शहा, आनंदराज डोसी, संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.