आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर शहरात ‘इलेक्ट्रो’त 25 कोटींची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात भरलेल्या सहा दिवसीय ‘इलेक्टो 2014’ प्रदर्शनात सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल झाली. सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशनने आयोजिलेले हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तब्बल आठशे जण कार्यरत होते. बुधवारी रात्री या प्रदर्शनाचा थाटात समारोप झाला. महेंद्र इलेक्ट्रॉनिक्सला बेस्ट ऑफ द बेस्टचा अँवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोप कार्यक्रमात लॉइड इलेक्ट्रॉनिक्सचे शाखा व्यवस्थापक जितेंद्र पंडित, निराली नॉन स्टीकचे शाखा व्यवस्थापक नरेंद्र शहागडकर, लक्ष्मी सोलारचे शशीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्समध्ये प्रत्येकी चार तर टेलिकम्युनिकेशनमध्ये दोन असे दहा अँवार्ड प्रदान करण्यात आले. प्रदर्शन काळात नीटनेटकेपणा, स्वच्छता, सुव्यवस्था अशी नियोजनबद्धता दिसून आली. सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर तर आभारप्रदर्शन दीपक मुनोत यांनी केले. परीक्षक म्हणून डॉ. सीमा किणीकर, अर्पिता गांधी आणि मालती प्रभाकर यांनी काम पाहिले. बंपर लकी ड्रॉ नंबर (इ 007044) घोषित करण्यात आला.
इलेक्ट्रो’ची सुरुवात
सोलापुरातील इलेक्ट्रॉनिक्सच्या काही वितरकांनी मिळून 1997 मध्ये इलेक्ट्रो प्रदर्शन भरवले. र्शमिक पत्रकार संघासमोरील मोकळ्या जागेत सुरुवात करण्यात आली. चार वर्षे येथे प्रदर्शन भरले. नंतर नॉर्थकोट मैदानावर चार वष्रे प्रदर्शन भरवण्यात आले. वाढता प्रतिसाद आणि जागेच्या कमतरतेमुळे हरिभाई देवकरण प्रशालेच्या दोन एकर मैदानात गेल्या सात वर्षांपासून प्रदर्शन भरवले जात आहे.
स्टॉल भाड्यातून 48 लाख
इलेक्ट्रो प्रदर्शनात दोन एकर जागेत 12 बाय 12 आकाराचे 275 स्टॉल लागले. यामध्ये 74 सभासदांनाच स्टॉल मिळाले. एका स्टॉलला 17,500 रुपये याप्रमाणे 275 स्टॉलचे 48 लाख, 12 हजार 500 रुपयाचे उत्पन्न संस्थेस मिळाले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची अधिक मागणी
उलाढालीची नेमकी रक्कम सांगता येणार नसली तरी सुमारे 25 कोटींची उलाढाल झाली असे म्हणता येईल. प्रदर्शनात बुकिंग होऊन पुढील दोन महिन्यांत वस्तू दिली जाते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कॉम्प्युटर आणि होम अप्लायन्सलाही मागणी होती.’’ विपीन कुलकर्णी, अध्यक्ष, सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स
यांना केले सन्मानित
इलेक्ट्रॉनिक्समध्ये नॉन कंपनी फिटेडमध्ये प्रथम सुयोग डिस्ट्रिब्युटर्स, द्वितीय सुंदर फोटो, कंपनी फिटेडमध्ये प्रथम वंश इले., द्वितीय चव्हाण ब्रदर्स, होम अप्लायन्स नॉन कंपनी फिटेडमध्ये प्रथम इर्शाद एअर सिस्टिम, द्वितीय गौरव एजन्सीज, कंपनी फिटेडमध्ये प्रथम कस्तुरे ब्रदर्स, द्वितीय संदीप एन्टरप्रायझेस, टेलिकम्युनिकेशनमध्ये प्रथम लोकमंगल आयटी किंग, द्वितीय साई कॉम्प्युटकर.
यंदाही मारली बाजी
2007 पासून अँवार्ड देण्याची परंपरा सुरू करण्यात आली. 2011 वगळता 2007 ते 2014 पर्यंत सलग महेंद्र इलेक्ट्रॉनिक्सनेच बेस्ट ऑफ बेस्ट स्टॉलचा अँवार्ड मिळवला. यंदा हा अँवार्ड महेंद्र इलेक्ट्रॉनिक्सचे मालक केतन शहा यांनी सहकुटुंब स्वीकारला.
680 जणांना मिळाला रोजगार
‘इलेक्ट्रो’च्या सहा दिवसीय प्रदर्शनात 680 जणांना रोजगार मिळाला. यामध्ये एमबीएच्या 375 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यांना दररोज प्रत्येकी 250 रुपये मानधन आणि प्रमाणपत्रही देण्य् ात आले. इव्हेंट विभागात 20 जणांनी काम केले आणि त्यांच्यावर 56 हजार रुपये खर्च झाला. मंडप, इलेक्ट्रीकल्स आणि साफसफाई असे मिळून 200 जणांनी काम पाहिले. यांच्यावर 17 लाख रुपये खर्च झाला. सुरक्षेसाठी 40 कर्मचार्‍यांवर 40 हजार रुपये खर्च झाले. इन्शुरन्स, अग्निशामक दल, पिंट्रर, टेबल-खुर्ची सप्लायरवर सुमारे 7 लाख 25 हजार रुपये खर्च झाले.