आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 हजार सोलापूरकरांनी दिली ‘इलेक्ट्रो 14’ला भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हरिभाई देवकरण प्रशालेच्या विस्तृत मैदानावर भरलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाला सलग पाचव्या दिवशीही मोठी गर्दी लोटली. मंगळवारपर्यंत 70 हजार 534 लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. वाहनतळ भरल्याने प्रशालेसमोरील रस्त्यालाही वाहनतळाचे रूप आले आहे. सोलापूर इलेक्ट्रिकल्स डिलर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘इलेक्ट्रो 2014’चा समारोप बुधवारी होत आहे. गड्डा यात्रा आणि इलेक्ट्रोसाठीच्या प्रचंड गर्दीमुळे संध्याकाळनंतर वाहतूक नियमन करताना पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

गॅस लिक न होणारे रेग्युलेटर
गॅस लिक न होऊ देणारे रेग्युलेटरही प्रदर्शनात आहे. पाइप तुटला आहे का किंवा टाकीत आणखी किती गॅस शिल्लक आहे याची माहिती देणारा अत्याधुनिक रेग्युलेटर दोन हजार रुपयांत उपलब्ध आहे. हा रेग्युलेटर किमान 20 वर्षे चालू शकेल असा दावा कंपनीने केला आहे.

चोर्‍या रोखणारे उपकरण
न फुटणार्‍या बल्बपासून अनेक नावीण्यपूर्ण उपकरणे प्रदर्शनात आहेत. शहरातील वाढत्या चोर्‍यांवर तोडगा असलेला ‘ई सेफ’ आणि सीसीटीव्ही विक्रीस उपलब्ध आहेत. मॅक्सेल कंपनीने बनवलेले ई सेफ हे उपकरण 5 ते 23 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रोमध्ये गॅस सिलिंडरमधून गॅस लिक होत असेल तर त्याची सूचना देणारा आणि गॅस प्रवाह रोखणारा अत्याधुनिक रेग्युलेटर.होम मैदान आणि हरिभाई प्रशालेच्या मैदानावरील वाहनतळ तोकडे पडल्याने हरिभाई समोरील रस्त्याला वाहनतळाचे रूप आले.

वाहतूक कोंडी झाली.
पाहणार्‍यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी, वाहनतळ भरल्याने हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्त्यावर आली वाहने, झाली वाहतूक कोंडी