आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elementary School Teacher Subject Coming Together For Promotion

पदोन्नतीसाठी शिक्षकांची शाळा , एकाच विषयाच्या पदवीधराचे समुपदेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विषय शिक्षक पदोन्नतीसाठी बुधवारी नेहरू वसतिगृहात शिक्षकांची शाळा भरली. जिल्ह्यातील विविध भागांतून पहिल्या टप्प्यात 576 शिक्षकांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. त्यामुळे सबंध परिसर शिक्षकांच्या गर्दीने भरला होता. ही प्रक्रिया आठवडाभर चालणार असून, 4500 शिक्षकांपैकी 900 जणांना पदोन्नती देण्यात येणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी मदारगणी मुजावर यांनी दिली आहे.

विषय शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी मूळ नेमणूक तारीख 26 सप्टेंबर 1995 तर जन्म तारीख 1 जून 1971 असलेले पदवीप्राप्त मराठी माध्यमातील सर्व शिक्षक आले होते. बुधवारी नेहरू वसतिगृह सोलापूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनी केले होते. जिल्ह्यातील सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षकांना पदोन्नती द्यावयाची असून, पहिल्या टप्प्यात 576 शिक्षकांना समुपदेशनाकरिता बोलावण्यात आले होते. सेवाज्येष्ठता यादीमध्ये ज्या शिक्षकांची नावे समाविष्ट करण्याची राहिली आहेत त्यांची नावे समुपदेशन सुरू होण्यापूर्वी करून घेण्यात आली. यापूर्वी एका शाळेवर दोनपेक्षा अधिक पदवीधर वेतन श्रेणीत शिक्षक कार्यरत असतील तर अशाना विषयनिश्चिती करण्यासाठी यापूर्वी मुख्याध्यापक पदावर अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाले असल्याचे मुजावर यांनी सांगितले.

दीड तास खोळंबली पदोन्नती
प्रथम बी.एड.च्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी प्राधान्य देण्याची मागणी काही शिक्षकांनी केली. शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार ही प्रक्रिया व्हावी, यासाठी मदारगणी मुजावर यांच्याकडे आग्रह धरला. त्यामुळे 4 ते 5.30 वाजपेर्यंत ही प्रक्रिया खोळंबली. त्यामुळे पूर्वी नाकारलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन व एकाच विषयाच्या पदवीधराचे समुपदेशन आज झाले.
तातडीने समायोजन करावे
समायोजनाची प्रक्रिया खूपच उशिरा चालू झाली आहे. परिणामी मुलांचे नुकसान होत आहे. त्यामुळे समायोजनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. त्याचबरोबर बी.एड.च्या शिक्षकांना प्राधान्य देण्याचाही विचार करावा. सुरेश पवार, राज्य संपर्क प्रमुख, प्राथमिक शिक्षक समिती