आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश: पसंतीच्या काॅलेजसाठी'परीक्षा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुणांच्या स्पर्धेत विद्यार्थी "मायुस' झाले असून दहावीत ९० टक्के मिळूनही मनपसंत महाविद्यालयांचे दरवाजे उघडत नाहीत या पार्श्वभूमीवर मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, की सेकंड लिस्टची वाट पाहावी या मनस्थितीत विद्यार्थी असल्याचे सोमवारी दिसून आले. दुसरी गुणवत्ता यादी जुलै रोजी लागेल.

माध्यमिक विभागाचे साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षिक सूर्यकांत सुतार म्हणाले, महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार गुणवत्ता यादी लावली आहे. प्रवेशाचे नियोजनबद्ध वेळापत्रक पाळावे. गुणवत्तेनुसार, आरक्षणानुसार प्रवेश द्यावा.

अकरावी प्रवेशाची कट ऑफ लिस्ट सोमवारी महाविद्यालयांमध्ये झळकली. हजारो अर्ज दाखल झाल्याने कट ऑफ लिस्ट उंचावणार याबाबतची स्पष्टता विद्यार्थ्यांमध्ये होतीच. तरीही विद्यार्थ्यांनी यादीत नाव अाहे की नाही याची प्रत्यक्ष खात्री केली. पहिल्या गुणवत्ता यादीनुसार दयानंद ८५ टक्के, वालचंद ९१ टक्के, संगमेश्वर ९२ टक्के, ए. डी. जोशी कनिष्ठ महाविद्यालय ९६ टक्केंवर बंद झाले. कॉमर्स शाखेतही गुणांची स्पर्धा दिसून आलीच.

डीएव्ही वेलणकर ६७ टक्के, संगमेश्वर ७८ तर हिराचंद नेमचंद कॉमर्स कॉलेजमध्ये ८१ टक्के कट ऑफ घोषित झाले. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांनी मनपसंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास प्रारंभही केला. शिल्लक जागांवर दुसरी गुणवत्ता यादी लागू शकते. संगमेश्वरने पहिल्या गुणवत्ता यादीबरोबरच दुसरी वेटिंग लिस्टही लावली.
बातम्या आणखी आहेत...