आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Employment Education News In Marathi,divya Marathi

मुलांना मिळणार जागतिक दर्जाचे रोजगाराभिमुख शिक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुलांना जागतिक दर्जाचे समाजोपयोगी रोजगारभिमुख दज्रेदार शिक्षण मिळावे व मुलांना प्राभावी शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने (डायएड) जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. अभ्यासक्रमातील आवश्यक बदल, मुलांमध्ये सृजनशीलता, नैतिकता, कल्पकता निर्माण होण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शिक्षणाच्या बदलत्या गरजा व नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

जिल्हास्तरीय कार्यकारी अंमलबजावणी समितीच्या वतीने 2014-15 या संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे सेवांतर्गत प्रशिक्षण व अनुधावनाचे नियोजन केले आहे. त्यानुसार शैक्षणिक व्यवस्थापन व नियोजन व प्रशासन, कलाशिक्षण, ज्ञानरचनावाद, नृत्य गायन, वादन शैक्षणिक कृती संशोधन व नवोपक्रम, गणित अध्यापन, इतिहास साहित्य निर्मिती व अध्यापन, स्पर्धा परीक्षा , मराठी अध्यापन, माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, भूगोल साहित्य निर्मिती व अध्यापन, स्पर्धा परीक्षा, पर्यावरण शिक्षण, शारीरिक शिक्षण, विज्ञान अध्यापन कार्यनुभव, जीवनकौशल्य शिक्षण, हिंदी अध्यापन, इंग्रजी संभाषण कौशल्य योगासन व आरोग्य शिक्षण, नाट्य कला, चित्रकाला व छायाचित्र, ध्वनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
समितीत यांचा आहे समावेश
समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल असतील. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर (डायएड)चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे उपाध्यक्ष असतील. सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर, विद्या परिषद पुणे प्रतिनिधी संजयकुमार राठोड, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कोर्टी येथील मुख्याध्यापक बी. ननवरे, आष्टी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश कांबोज, सचिव म्हणून जिल्हा प्रशिक्षण संस्था सोलापूरचे उपप्राचार्य डॉ. आय. पी. नदाफ काम पाहतील.