सोलापूर- शिवाजीचौक ते जुना पुणे नाका रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे बुधवारी काढून टाकण्यात आली. महापालिका अतिक्रमण विरोधी विभाग पोलिस यंत्रणेने दुसऱ्या दिवशीही मोहीम राबवली. खोकी, हातगाड्यांना हटवण्यात आले. रस्ता अतिक्रमण मुक्त झाल्याने मोठा वाटत होता. वाहतूकही सुरळीत झाल्याचे िदसत होते.
बसस्थानक ते एचपी पेट्रोल पंप भागातील अतिक्रमणे काढून टाकली. पंपाजवळील राज हार्डवेअर स्वामी समर्थ दुकानांचे अतिक्रमण व्यावसायिकांनी स्वत:हून काढून घेतले. शिवगंगा रेडियम जवळील सहा फुटी भिंत पोकलेनने पाडण्यात आली. पथकाचे प्रमुख मोहन कांबळे यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी यशवंत शिर्के यांना व्यावसायिकांनी आम्ही जगावे कसे? असा सवाल करत घेराओ घातला. काही काळासाठी वाहतूक खोळंबली. शिर्के यांनी समजूत काढून त्यांना हटवले.
अशीही चलाखी
काहीव्यावसायिकांनी पथक येताच
आपला गाशा गुंडाळून एसटी आरक्षण कार्यालयानजीक हातगाडे हलवले. पालिका कर्मचाऱ्याची पाठ फिरताच पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचे दुपारी चित्र होते. काळी मशिदकडे मार्गावर दिलखुश हॉटेल आहे. तेथे वडाच्या झाडाचा आसरा घेत एक टपरी रस्त्यावर थाटली आहे. त्याकडे अजून पालिकेचे लक्ष गेले नाही.
फेरीवाल्यांसाठी पर्यायाचा शोध