आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी चौकात आजही चालणार बुलडोझर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काकडी विक्रेत्या तरुणाचा बळी आणि शिवाजी चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीसंबंधीच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर मंगळवारी महापालिका, आरटीओ आणि पोलिस प्रशासनाला जाग आली. सकाळी दहा वाजता शिवाजी चौक ते जुना पुणे नाका या रस्त्यावरची काही अतिक्रमणे हटवण्यात आली. इतर काही अतिक्रमणे बुधवारी काढण्यात येणार आहे.

चौकात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ही अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाचे पथक चौकात गेले असता, तेथील फेरीवाल्यांनी काही प्रमाणात विरोध केला. विरोधाला जुमानता मनपाने काही टपऱ्या काढल्या. त्यानंतर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर प्रवीण डोंगरे, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी चौकाची पाहणी करून पुढील कारवाईचे आदेश दिले. चौकातील सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश त्यांनी मोहन कांबळे यांना दिले.

शिवाजी चौक ते जुना पुणे नाका हा रस्ता दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी मोकळा झाला. ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पोलिसांचा फौजफाटा असल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण, कायमस्वरूपी तोडगा आणि उपाययोजना गरजेच्या आहेत. वाहनांचे अतिक्रमण, नो-पार्किंग झोन, साइडचे पांढरे पट्टे, बॅरीकेिडंग आदी सुविधा आल्यास वाहतूक सुरळीत होईल. शिवाजी पुतळ्याजवळ अवजड वाहने अथवा, व्हॉल्वो बस वळताना वाहतुकीची कोंडी होत आहे.

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी बैठक घेऊन वाहतूक नियोजनासाठी आरटीओ, वाहतूक पोलिस, महापालिका यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दोन दिवसांपासून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता कुठलीही मोहीम सोलापुरात कायमस्वरूपी राहिली नाही. यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
महापालिकेने बॅरीकेिडंग, साइड पट्टे, रिक्षा थांबासाठी जागा, अतिक्रमण काढणे आदी सुविधा दिल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. शिवाजी चौैकात रस्त्याच्या कडेला आजोरा पडला आहे. अतिक्रमण वाढले आहे, दिशादर्शक फलक लावून द्यावेत, अशी मागणी पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी केली. मंगळवारी दिवसभर श्री. शिर्के त्यांचे पथक चौकातच ठाण मांडून होते. वाहतूक नियोजनासाठी वाढीव संख्याबळ नेमले आहे.

जुना पुणे नाका ते शिवाजी चौक ते सरस्वती चौक मार्गावर उड्डाणपुलाची गरज आहे. बसस्थानक जुना पुणे नाका येथे हलवण्यात यावे. भुयारी पादचारी पूल अथवा स्काय वॉक करता येईल का? याचाही विचार व्हावा. खासगी बस, अॅपेरिक्षा, रिक्षा, जीप यांना ठराविक ठिकाणी अथवा चौकापासून लांब अंतरावर थांबण्यास मुभा द्यावी. सम्राट चौक, बाळीवेस, जुना पुणे नाका, नवीवेस पोलिस चौकी या मार्गावर ये-जा करण्यासाठी रस्ता आहे, त्याठिकाणी सिग्नल लावण्यात यावेत