आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 25 दुकाने भुईसपाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अक्कलकोट रस्त्याजवळ शासकीय तंत्रनिकेतनच्या संरक्षित भिंतीलगतची अतिक्रमण केलेली दुकाने बुधवारी काढण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) आणि महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाच्या मदतीने कारवाई केली. अतिक्रमण झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’त (14 जून) प्रसिद्ध झाले होते. त्यानंतरही कारवाई झाली.

शांती चौक ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत 25 खोकी काढण्यात आली. संगमेश्वर नगर येथील अतिक्रमणही काढण्यात आले. या वेळी पोलिस बंदोबस्त होता. सुरुवातीला या जागेवर एक सायकल स्टॅन्ड होते. त्यानंतर चार चाकी गाड्या ठेवणे सुरू झाले. जूनमध्ये तर काहींनी पत्र्याचे शेड मारून मोठी दुकाने सुरू केली. दुकानावर नेत्यांच्या छबी असलेले डिजिटल फ्लेक्स होते. यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आणि तेथे नव्या दुकानांसाठी बांबूचे सांगाडे उभे राहिले होते.

पीडब्ल्यूडीचे शाखा अभियंता संजय राठोड, महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बाळासाहेब भोसले, वसंत पवार, नजीर शेख आदींसह मोठय़ा प्रमाणात कर्मचारी आणि पोलिस उपस्थित होते.