आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Encroachment The Of Seth Govindji Raoji Try To Ayurveda Medical College's Garden

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागा हडपण्याचा प्रयत्न, आयुर्वेद शाळेच्या औषधी बागेत झाडांची नासधूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सम्राट चौक येथील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या औषधी बागेत सुमारे सव्वाशे लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीने जागा हडपण्याचा बेत हाणून पाडला. यात लोकांनी औषधी रोपांची मोठी नासधूस केली. हा प्रकार जूनला घडला.
महाविद्यालयाच्या परिसरातील आडवा नाला भागात ही बाग आहे. महाविद्यालयाने १९९७मध्ये औषधी रोपे लावण्यासाठी ही जागा पाटबंधारे खात्याकडून घेतली आहे. मालकी पाटबंधारे खात्याचीच आहे. तिथे महाविद्यालयाने मदन फळ, अडूळसा, हिरडा, बेघडा, अर्जुन आदी विविध प्रकारचे २०० दुर्मिळ वनस्पतींची झाडे लावली. त्याचा उपयोग औषधनिर्मितीसाठी केला जात होता.

जून रोजी अचानक परिसरातील सुमारे सव्वाशे लोकांनी बागेचे कंपाऊंड उचकटून प्रवेश केला. औषधी वनस्पती उपटून, तोडून टाकली आणि चिंध्यांनी केलेल्या दोऱ्या बांधून जागेवर कब्जा केला. महाविद्यालयाच्या लोकांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता उलट त्यांनाच धमकावण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयाने हा प्रकार पाटबंधारे खात्यास कळवला. अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने हा प्रकार रोखला. जून रोजी जागेवरील दोऱ्या हटवण्यात आल्या.
औषधी वनस्पतींचे मोठे नुकसान
- वनऔषधी उद्यानामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रकार जूनला झाला. जागा पाटबंधारेकडून घेतली आहे. हा प्रकार त्यांना कळविला. त्यांनी पोलिसांना सांगून तो प्रकार थांबविला. मात्र खुप दुर्मिळ वनस्पतींच्या झाडांचे नुकसान झाले. येथून दरवर्षी अनेक विद्यार्थी घडतात. याचा सर्वांनी विचार करावा.”
डॉ. अनिल माने, मुख्याध्यापक,महाविद्यालय