आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering College,Latest News In Divya Marathi

मुलींना पळवून नेणार्‍या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विजापूर रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या दोघा तरुणांनी त्याच कॉलेजात शिकणार्‍या दोघा मुलींना पळवून नेले होते. त्या चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेऊन शनिवारी सकाळी अकराच्या सुमाराला विजापूर नाका पोलिस ठाण्यात हजर केले. दरम्यान, ‘त्या’ दोन्ही तरुणांवर दुष्कर्म केल्याचा नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. रोशन रमेश देवाडिगा उर्फ शक्ती (वय 19, रा. राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर), धीरज जितेंद्र दारलू (वय 19, रा. कुमठेकर हॉस्पिटलजवळ, जुळे सोलापूर ) या दोघांना न्यायाधीश कल्पना होरे यांनी चार दिवस पोलिस कोठडी दिली आहे.
तरुणांनी मुलींना कर्नाटकात कुठे पळवून नेले होते याची त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. त्यासाठी पोलिस कोठडीची गरज आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील सार्थक चिवरी यांनी केला. संशयित तरुणांतर्फे अँड. शशी कुलकर्णी, अँड. प्रशांत नवगिरे, अँड. विश्वास शिंदे यांनी बाजू मांडली. पोलिसांनी यापूर्वी 363 कलम लावले आहे. आता 376 कलम (दुष्कर्म ) लावले आहे. पोलिसांनी दबावात येऊन कलमाची वाढ केली आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची काही गरज नसल्याचा युक्तिवाद केला. रमेश देवाडिगा उर्फ शक्ती, जितेंद्र दारलू, मंगल दारलू या तिघांना मुलांना मदत केल्याप्रकरणी बुधवारी अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने जामीन दिला होता. लग्न करण्यास भाग पाडले, अनैतिक कृत्य करण्यासाठी पळवून नेणे ही नवीन दोन कलमे पोलिसांनी यापूर्वीच वाढविली होती. त्यावर न्यायालयाने नोटीस काढून आरोपींतर्फे बाजू मांडण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. दोन्ही तरुण आणि मुली उडपी परिसरातून ताब्यात घेतल्याचे साहाय्यक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले.