आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Result News In Marathi, Solapur University, Vice Chancellor

110 दिवसांनंतरही नाही लागला अभियांत्रिकी द्वितीयचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाने तब्बल 110 दिवसांनंतरही अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा निकाल घोषित केलेला नाही. त्यामुळे गुरुवारी शेकडो विद्यार्थी विद्यापीठाच्या दारात बसले. निकाल द्या, कारणे नकोत असे म्हणत, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या भेटीसाठी गेटवर ठिय्या मारला. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी कुलगुरूंसमोर आपले म्हणणे मांडले आणि शनिवारी दुपारी निकाल घोषित करतो, असे आश्वासन दिले. यानंतर विद्यार्थी परतले. काही विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडेही धाव घेऊन व्यथा मांडली. अभाविप, एनएसयूआय, भारतीय विद्यार्थी सेना, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड या विद्यार्थी संघटनांनी निवेदन दिले.


त्रुटी दूर केल्या जातील
प्रॅक्टिकलचे गुण वेळेत अपलोड न केल्याने निकाल रखडला असला तरी आता ते पूर्ण झाले आहे. उद्या शुक्रवारी सर्वच कर्मचार्‍यांना निवडणूक ड्युटी लावल्याने शनिवारी दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन मिळेल. या निकालात त्रुटी आढळल्यास विद्यार्थी विद्यापीठाकडे संपर्क साधू शकतात. संभाव्य त्रुटींचा विद्यापीठ त्वरेने निपटारा करेल.’’ डॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू


..अन्यथा गाढव मोर्चा
तीन महिने रखडलेला निकाल आता शनिवारपर्यंत लावण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. निकाल घोषित न झाल्यास गाढवे आणून हलगी वाजवत विद्यापीठासमोर उभे राहणार आहोत.’’ लहू गायकवाड, भारतीय विद्यार्थी सेना
निकाल लवकर लागावा यासाठी विद्यार्थी विद्यापीठाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, तीन महिने उलटून गेले. आता विद्यार्थ्यांचा अंत न पाहता त्वरित निकाल घोषित करावा.’’ प्रा. सतीश राजमाने, सोलापूर युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशन