आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरचं बदलतंय वायुमान; झाडांची बेटे केली पाहिजेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एखाद्या ठिकाणचे हवामान सांगताना तेथील तापमान, आर्द्रता, पाऊस याचा उल्लेख केला जातो. प्रत्यक्षात वायुमान आणि हवामान यामध्ये वेळेचे अंतर आहे. हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणाचे सुमारे एक ते पाच दिवसाचे सरासरी तापमान सूर्यप्रकाश, आर्द्र्रता, पाऊस यांचा समावेश केला जातो. वायुमान म्हणजे त्या ठिकाणचे गेल्या 30 वर्षांचे सरासरी हवामान होय.

सोलापूरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आपणाला प्रथम एवढेच सांगता येईल की सोलापुरात दुपारचे ऊन जास्त असते.
परंतु गेल्या काही वर्षांत सोलापूरचे वायुमान बदलत चालले आहे. हवामान दर आठवड्याला बदलते, पण वायुमान बदलायला काही काळ जावा लागतो. असा बदल दिसू लागला आहे, मात्र तो कमी असून अजून बराच बदल होणे अपेक्षित आहे. ते कसे करता येईल त्याचा विचार जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करू या.
सुमारे 65 -66 वर्षे राहत असल्यामुळे वायुमानातील फरक लक्षात येत राहिला आहे. लहानपणी सोलापुरात पावसाळ्यात पाऊस कमी असायचा. मृग नक्षत्र लागले आणि पाऊस सुरू झाला, असे कधीच होत नसे. सबंध जून महिना कोरडाच जायचा. आॅगस्टच्या शेवटी शेवटी थोडा पाऊस पाडायचा. परंतु गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलते आहे. साधारणत: 1977-78 नंतर सोलापूरचे हवामान बदलल्याचे जाणवले. याची काही कारणे पाहिली की या बदलात वनराईचा वाटा किती मोठा आहे ते लक्षात येईल. याच सुमारास सोलापूरची वरदायिनी भीमा नदी हिच्यावर उजनी येथे धरण बांधून पूर्ण झाले होते. त्याच्या बाष्पीभवनामुळे हवेतील आर्र्द्रतेचे प्रमाण वाढले होते. हे बाष्प वाºयाने सोलापूरच्या दिशेने आल्यामुळे सोलापूरची हवा थंड होऊ लागली होती. 1975 मध्ये केलेल्या वृक्ष खानेसुमारीप्रमाणे त्यावेळच्या शहरात 75,000 झाडे होती. नंतरच्या खानेसुमारीनुसार 2001 च्या सुमारास शहरात सुमारे 3 लाखांहून जास्त झाडे होती. या दरम्यान शहराची हद्दवाढ झाली होती, (1992) नवीन अंतर्भूत झालेल्या भागातील झाडीही यात समाविष्ट होती.
मला आठवतेय की कॉलेजमधून भर दुपारी, परीक्षाच्या काळात रेवणसिद्धेश्वराच्या देवळाकडील रस्त्याने येताना तेथील झाडांखालून थंड सावलीतून यायला आनंद व्हायचा. तिथे असलेल्या गुलाबी शिरीषाच्या 52 झाडांखाली काही गुराखी आपली जनावरे सोडून झोपलेले असायचे सावलीतले तापमान 8-9 सेल्सिअसने कमी असायचे! (आता त्यातली बरीच झाडे तोडली आहेत.) लोणावळा, महाबळेश्वर व गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे बेळगाव अशा ठिकाणची वनराई याचा साक्ष आहे. त्याशिवाय झाडे आणखी एकाप्रकारे हवामान थंड ठेवण्याचे कार्य करतात. झाडांमुळे हवेतील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी केले जाते. वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या क्रियेने अन्न तयार करतात, हे आपणास माहीत आहेच.