आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समता-बंधुता बुद्धांमुळे : साळुंखे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-निर्वाहासाठी भिख्खूने पिंडपात घ्यावा. मात्र, तो घेताना भेद करत एकाही घराला वगळता कामा नये, अशी सपदान पिंडपाताची पद्धत तथागत बुद्धांनी सुरू केली. अडीच हजार वर्षांपूर्वी सुरू केलेली ही पद्धत चातुर्वण्र्य व्यवस्थेला सुरूंग लावणारी होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी येथे केले. यातून समाजात समता आणि बंधुता निर्माण करण्याचे काम बुद्धांनी केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिवर्तन अकादमी आणि मित्रमंडळाच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन येथे तथागत बुद्ध : एक आकलन या विषयावर डॉ. साळुंखे यांचे तीन दिवसांपासून व्याख्यान सुरू होते. त्याचा समारोपाच्या व्याख्यानात ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. योगिराज वाघमारे समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, की गृहस्थार्शमाकडे दुर्लक्ष केले, संसारत्यागाला प्रोत्साहन दिले, असा आरोप बुद्धांवर केला जातो. मात्र, तथागत बुद्धांनी भिख्खू आणि उपासक दोन्हीही सारखेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
दोन्ही स्थितीतून उच्चतम अवस्था गाठता येते, असे सांगितले. समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी करू इच्छिणार्‍यांसाठी भिख्खू होण्याचा मार्ग खुला होता, असेही त्यांनी सांगितले. आणि बुद्धांनी स्मित केले
सुनीत नावाच्या तरुण सफाई कामगारास ‘ये भिख्खू’ असे संबोधत त्याला तथागतांनी संघात घेतले. त्यांनी संघात स्वत:चे असे आदराचे स्थान मिळवले. त्यांना समाजातील प्रतिष्ठित लोक अभिवादन करत असल्याचे पाहून तथागत बुद्ध यांनी स्मित केले. जन्माने ऐवजी कर्माने माणसाचे स्थान ठरावे, असा अभिप्रेत असलेला समाज त्यांना यात दिसत होता. बुद्धांचे हे स्मित भारतीय संस्कृतीच्या क्षितिजावरील अतिशय देखणे स्मित होय.
संसार संपदा महत्त्वाच्या
उत्थान : आळस झटकून प्रत्येक कामाला लागा. सुख तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही.
आरक्ष : जी संपत्ती आहे, जे काही आपल्या ठायी आहे, त्याचे रक्षण करणे.
कल्याणमित्रता : अर्थापेक्षाही मनुष्यसाठा महत्त्वाचा आहे. आपल्या सुख-दु:खात येणार्‍या लोकांमुळे आपली कल्याणमित्रता ठरते. सुखात नाही मात्र कुणाच्या तरी दु:खात धावून गेले पाहिजे.
समजीविता : आपल्या रोजच्या माणसांना जवळ घेऊन त्यांच्या दु:खात सामील होणे. आहे त्या गरजांसाहित आपले आयुष्य व्यथित करणे महत्त्वाचे आहे. खूप अपेक्षा करू नका.
सहा दिशांना नमस्कार
बुद्धांच्या आयुष्यातील ही घटना. ते सिगाल नावाच्या एका व्यक्तीला रोज सहा दिशांना नमस्कार करताना पाहत. त्यांनी एके दिवशी त्याला विचारले की, तू हे का करतो. त्याने उत्तर दिले, ‘माझ्या वडिलांनी मरताना सांगितले होते, रोज सहाही दिशांना नमस्कार कर.’ तेव्हा बुद्धांनी त्याला सांगितले की, अरे त्याचा अर्थ असा आहे की तू अंग झटकून सहाही दिशांच्या दिशेने काम कर. त्याने तुझ्या आयुष्यातील सुख तुला सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे त्याला दिशांचा अर्थ कळला. आज प्रत्येकाला हा नियम लागू होतो. जो कष्ट करेल, त्याला सुख कधीही सोडून जात नाही.