आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Era Of Competition Law Restrictions On Media Palavita Retired Justice Ajit Shah

स्पर्धेच्या युगात माध्यमांनी कायद्याची बंधने पाळावीत- निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-प्रसिध्दी माध्यमे व न्यायालये यांनी मोठे कार्य केले आहे. न्यायव्यवस्थेची बहुतांश माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते. ती लोकांना वृत्तपत्रातून कळते. आज स्पर्धेच्या युगात ब्रेकिंग न्यूज करताना कायद्याची बंधने माध्यमांनी पाळावीत, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अजित शहा यांनी केले.
के. भोगीशयना मेमोरियल फाउंडेशन आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्यातर्फे र्शी. शहा यांची लॉ कमिशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी व इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल माजी न्यायमूर्ती एम. एस. जामदार यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वृत्तपत्रे आणि न्यायालये या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. हि. ने. वाचनालयाच्या किलरेस्कर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास डॉ. राजीव प्रधान, बारचे अध्यक्ष शिवशंकर घोडके, सचिव महेश जगताप, अँड. जे. जे. कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
ख्रिश्चन धर्मगुरू ग्रॅम स्टेन, आरूषी तलवार, जेसिका लाल, कटारा, बीएमडब्ल्यू हिट रन या केसेसमध्ये मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. टूजी घोटाळ्यासह अनेक घोटाळे मीडियाने उघडकीस आणले. यामुळे मीडियाची आज समाजाला गरज आहे. न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूजचा अतिरेक होतोय. त्यात बदल करण्याची गरज आहे, असे शहा यावेळी म्हणाले. निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांचा निवृत्त न्यायमूर्ती एम. एस. जामदार यांच्या हस्ते शनिवारी मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राजीव प्रधान, अँड, ज़े. जे. कुलकर्णी, बार असोसिएशनचे शिवशंकर घोडके , महेश जगताप उपस्थित होते.