आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Evarestveer Anand Bansode Five Lac Prize Issue Solapur Municipal Coroporation

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यास पाच लाख देण्यावरून महापौरांचे घूमजाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यास महापालिकेतर्फे जाहीर केलेली मदत देण्याबाबत महापौर अलका राठोड यांनी घूमजाव केला आहे. बनसोडे कुटुंबीयांनी याबाबत विचारले असता पाच लाखांची रक्कम मोठी आहे. महापालिकेची सद्य:स्थिती पाहता ती देता येणार नाही. भूखंड आणि महापालिकेत नोकरीही देता येईल, असे अलका राठोड यांनी सांगितल्याचे बनसोडे यांनी सांगितले. दरम्यान, महापौर राठोड यांनी मदत नाकारल्याचा इन्कार केला आहे.

एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर आनंद यास महापालिकेतर्फे पाच लाख, एक भूखंड आणि महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात महापौर राठोड यांची भेट घेतली असता रक्कम देणे कठीण असल्याचे आनंद यांच्या आई पार्वतीबाई यांना सांगितले. थोडीशी रक्कम येत्या आठ दिवसांत देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आनंदची बहीण रूपाली, अंजली व मंजू सोबत होत्या.

युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील माऊंट शास्ता शिखरावर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा विक्रम आनंदच्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ‘उंचीवरील गिटार वादन’ अशी तर नोंद झाली. पण नुकतीच याची नोंद जागतिक स्तरावरील युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही ‘सर्वात उंचीवर भारताचे राष्ट्रगीत वाजविणारा’ अशा मथळ्याखाली झाली आहे. तसे प्रमाणपत्र त्यास दिले आहे.

पुणे पालिकेचे कौतुकास्पद कार्य
पुण्याची गिर्यारोहक कृष्णा पाटील हिने एव्हरेस्ट सर केल्यानंतर एका सहकारी बँकेने दिलेले 30 लाखांचे कर्ज माफ केले. राज्य सरकारने 5 लाख, शिवसेनेने 10 लाख रुपयांची त्वरित मदत केली. गिरीप्रेमी संस्थेला पुणे महापालिकेने 10 लाख दिले. सोलापूर महापालिकेचे धोरण नेमके याउलट आहे. रक्कम अदा व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे.
- सुरेंद्र शेळके, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड माऊंटेनेअरिंग संस्था

शब्द पाळण्याचे वचन देते
सोलापूरच्या सुपुत्राने चांगली कामगिरी केली याबद्दल मला खूप अभिमान आहे. भूखंड किंवा पैसे देता येणार नाही असे मी सांगितलेले नाही. मदतीसंदर्भात गुरुवारी सभागृह नेते, आयुक्त यांची बैठक घेऊ. एलबीटीमुळे आर्थिक समस्या आहेत. शब्द पाळू असे वचन देते. दोनही आमदारांच्या मदतीने हा प्रश्न मार्गी लावणारच.
- अलका राठोड, महापौर