सोलापूर - जिवंत ज्वालामुखी असलेला कठीण कातळाचा, कीर्द जंगल असणार्या व तब्बल 19 हजार 341 फूट उंचीचा दक्षिण आफ्रिकेतील माउंट किलिमांजारो पर्वत चढाईसाठी सोलापूरचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे शुक्रवारी रवाना होत आहे.
वर्ल्डपीस सेव्हन समीट मोहिमेतील आनंदचा हा तिसरा टप्पा आहे. 2012 मध्ये एव्हरेस्ट, तर गत महिन्यातच त्याने युरोपातील माउंट एल्ब्रुस सर केले होते. एक महिन्याच्या कालावधीतच आनंद आपल्या तिसर्या टप्प्याच्या मोहिमेवर निघाला आहे. किलिमांजारो पर्वतावर 15 ऑगस्टला सकाळी तिरंगा फडकाविण्याची जिद्द त्याने बाळगली आहे. यासाठी सोलापुरातून 8 ऑगस्टला मुंबईकडे तो रवाना होईल. तेथून आफ्रिकेतील नैरोबी (केनिया) मार्गे टांझानियाला जाईल. पर्वत चढाईसाठी साधारणत: नऊ दिवस लागतात, पण आनंदला सहा दिवसांत म्हणजे 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करायची आहे. म्हणूनच विर्शांती न घेता तो सलग चढाई करेल.
किलिमांजारोविषयी
दक्षिण आफ्रिका खंडातील टांझानिया या देशात उत्तर दिशेला हे सर्वोच्च् शिखर आहे. याला उथरू शिखर किंवा किबो शिखर असेही म्हणतात. या पर्वतावर किबो, मेवान्झी, शिरा हे तीन ज्वालामुखी आहेत. हा जगातील सर्वात मोठा असा फ्री स्टँडिंग पर्वत आहे. म्हणजे इतर ठिकाणी पर्वतांची माळच असते.