आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everest Gallant Anand Bansode,Latest News In Divya Marathi

स्वातंत्र्यदिनी आफ्रिकेच्या ‘एव्हरेस्ट’वर तिरंगा;वाजली राष्ट्रगीताची धून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारोवर सोलापूरचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे याने स्वातंत्र्यदिनीच सकाळी तिरंगा फडकावून देशाला अभिनव पद्धतीने वंदन केले. राष्ट्रगीताची धूनही त्याने तेथे वाजवली. त्याच्या माध्यमातून भारताच्या संविधानाची प्रतिमाही आफ्रिकेतील सर्वोच्च उंचीवर पोहोचली.
आनंदने वर्ल्ड पीस सेवन समीट मोहीम आखली आहे. याअंतर्गत त्याने हे तिसरे सर्वोच्च शिखर पार केले. जगातील सातही खंडातील सात सर्वोच्च शिखरे तो टप्प्याटप्याने सर करणार आहे. आशियातील एव्हरेस्ट, युरोपातील एल्ब्रुसनंतर आफ्रिका खंडातील किलीमांजारो हे शिखर त्याने सर केले. आता चौथ्या टप्प्यात तो ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट कोस्कीझ्को सर करणार आहे. आनंदनेही पर्यावरणाच्या बचावासाठी, पाणी वाचवण्याचा संदेश देणारी मोहीम किलीमांजारोच्या माध्यमातून पूर्ण केली. शिखरावर जाताना आनंदने सोबत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाही सोबत नेल्या. या प्रतिमा प्रथमच आफ्रिका खंडातील सर्वोच्च ठिकाणी गेल्या.
शाखा अभियंता राजेश जगताप यांच्या माध्यमातून संपर्कात आलेले पुणे येथील अभियंता प्रमोद साठे यांनी आपल्या व्यंकटेश ग्रुपच्या माध्यमातून आनंदला या मोहिमेसाठी संपूर्ण प्रायोजकत्व दिले. आनंदने एमएस्सी भौतिकशास्त्र या विषयात पूर्ण केले असून सध्या एनसीएल पुणे येथे डॉ. सतीश ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च प्रोजेक्ट करत आहे. आनंदचे गुरू सुरेंद्र शेळके व सागरमाथा गिर्यारोहण संस्थेचे मार्गदर्शन आनंदला मिळाले. दिल्ली येथील मिशन आऊटडोअर या कंपनीने मोहिमेचे आयोजन केले होते.