आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Every Month Solar Energy Saving 40 Thousand Ruppes In Corporation

सौरऊर्जा महापालिकेची दरमहा 40 हजारांची बचत करतोय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेच्या आठ प्रसूतिगृहांत बसवलेल्या सौरऊर्जा संचांमुळे दरमहा सुमारे 40 हजार रुपयांची वीज बिलात बचत होते. जिल्हा वार्षिक योजनेतून महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील तीन इमारतीत सौरऊर्जा संच बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे 30 हजार रुपयांची आणखी बचत होणार आहे.

महापालिकेच्या भावनाऋषी प्रसूतिगृहसह, बॉईज, लेडी डफरीन हॉस्पिटल, दाराशा हॉस्पिटल, साबळे, चाकोते, रामवाडी आणि जिजामाता प्रसूतिगृहात सौरऊर्जा संच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून बसविण्यात आले. त्यामुळे बाळंतीण महिलांना गरम पाण्याची सोय झाली. याशिवाय पॉवर पॅक, स्ट्रीट लाइट आदी सोयी प्रसूतिगृहांत झाल्याने रुग्णांची सोय झाली.

महापालिका इमारतीसाठी 57 लाख 67 हजार रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. इंद्रभुवन, प्रशासकीय इमारत आणि कौन्सिल हॉल या तीन इमारतीत हे संच बसविण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवर संच बसविण्यात येतील.
दीड कोटीचा प्रस्ताव
500 सौरदिवे बसवणे, गतिरोधकाच्या ठिकाणी 200 स्टिकर, सोलर स्टड 400 या कामांसाठी एक कोटी 55 लाखांचा प्रस्ताव सभेकडे आहे. त्यावर निर्णय प्रलंबित आहे. 200 ठिकाणी सोलर दिवे बसवले होते. मात्र, त्यातील बॅटर्‍या चोरीस गेल्याने ते बंद आहेत. चोर्‍यांमुळे बागेत, मंडई परिसरात सौरऊर्जा संच बसवण्याचा निर्णय झाला. प्रसूतिगृह, महापालिका इमारत, रस्त्यावर सौरऊर्जा संच बसवल्यास दरमहा एकूण 70 हजारांची बचत होईल, असा अंदाज महापालिका विद्युत विभागाचा आहे.