आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस म्हणतात सर्व बंद; मग हे काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरात सर्वत्र अवैध व्यवसाय सुरू असून, खुलेआम मटका, अवैध दारूिवक्री, जुगाराचे क्लब आदी सुरू आहेत. परंतु अवैध धंदे बंद असल्याचा दावा पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी केला आहे.
हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांसाठी संबंधित पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांिगतले होते. आयुक्त रासकर यांनी शहरात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असतील तर संबंधित पोलिस निरीक्षकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जानेवारी रोजी दिला होता. इशारा देण्यापूर्वी आणि नंतरही अवैध व्यवसाय सुरूच आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षकांना विचारले असता, अवैध व्यवसायांिवरुद्ध कारवाई सुरू आहे, असे उत्तर दिले. कारवाई कोणावर, किती प्रमाणात सुरू आहे, ही माहिती दिली नाही. शहरातील अवैध व्यवसाय बंद आहेत असे मी समजलो होतो, असे वक्तव्य पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी पत्रकारांसमोर केले होते. शहरात काय सुरू आहे, काय नाही याची सर्व कल्पना खुद्द पोलिस आयुक्तांनाच नसल्याचे दिसून आले. टपऱ्यांमध्ये पाटी लावून मटका घेतला जात आहे. अवैध दारूची विक्री राजरोसपणे सुरू आहे.
जुगाराचे क्लबही जोमात
मुल्लाबाबा टेकडी, लोणार गल्ली, पांजरापोळ चौक पेट्रोल पंप शेजारी, मेकॅनिक चौक, लोकमान्य नगर एका शाळेशेजारी, मंगळवेढा तालीम, इंदिरानगर दुर्गा हॉटेल परिसर, बुधवार बाजार परिसर, रेल्वे लाइन गुडलक हॉटेल परिसर, दमाणी नगर समाज मंदिर परिसर, कस्तुरबा मंडई शेजारी, यशोधरा हॉस्पिटल परिसर, नई जिंदगी मदिना चौक परिसर, मोदी परिसर आदी ठिकाणी जुगाराचे क्लब जोमात सुरू आहेत. कल्पना टॉकिज परिसरात बेकायदा मद्यविक्री सुरू आहे.