आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ex Corporetor Anant Jadhav Not Present In Yerwada Jail

माजी नगरसेवक जाधव येरवड्यात गैरहजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जन्मठेप प्रकरणी पुण्याच्या येरवडा कारागृहात सजा भोगत असलेला आरोपी माजी नगरसेवक अनंत जाधव 15 दिवसांच्या अभिवचन रजेवर गेला होता. मुदत संपूनही तो पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने तुरुंगरक्षकाने फिर्याद दिली आहे. मराठा वस्ती येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका खूनप्रकरणात येरवडा कारागृहात शिक्षेत असलेला अनंत ज्ञानेश्वर जाधव (रा. अवंतीनगर, पुणे नाका) 25 सप्टेंबर 2013 ते 10 ऑक्टोबर 2013 असा 15 दिवस अभिवचन रजेवर होता. त्याला 10 तारखेला पुन्हा कारागृहात हजेरी लावणे आवश्यक होते. तो हजर न झाल्याने कारागृहाचे तुरुंगरक्षक राहुल मारुती भोसले (वय 30, मध्यवर्ती कारागृह वसाहत, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास मुख्य पोलिस निरीक्षक साळुंखे करीत आहेत.